Don't buy these things on Akshaya Tritiya प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Edited Image)

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2025) हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी सर्व शुभ कामे करता येतात. सर्व शुभ वस्तू खरेदी करता येतात. या दिवशी लोक सोने आणि चांदीसारखे मौल्यवान धातू खरेदी करतात. पण, काही गोष्टी अशा आहेत ज्या या दिवशी खरेदी करू नयेत. या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते, तसेच नकारात्मकतेसोबतच घरात आर्थिक समस्याही येऊ शकतात. यावर्षी अक्षय्य तृतीया बुधवार, 30 एप्रिल 2025 रोजी येत आहे. या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करू नयेत हे जाणून घेऊयात.

अॅल्युमिनियम आणि स्टीलची भांडी

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नयेत. याशिवाय प्लास्टिक, स्टील किंवा अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत. या वस्तू राहूशी संबंधित असल्याचे मानले जाते, ज्यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते आणि संपत्तीचे नुकसान होऊ शकते. (हेही वाचा - Akshaya Tritiya 2025 History, Significance: का साजरा केली जाते अक्षयतृतीया? जाणून घ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसाचे महत्व व पौराणिक घटना)

तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चाकू, ब्लेड, कात्री आणि कुऱ्हाड यासारख्या धारदार आणि टोकदार वस्तू खरेदी करू नयेत. असे म्हटले जाते की, अशा वस्तू खरेदी केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. (हेही वाचा - Akshaya Tritiya 2025 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? पूजेचा शुभ मुहूर्त आणि तारीख घ्या जाणून)

काटेरी झाडे

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, कॅक्टस आणि क्रोटन इत्यादी काटेरी झाडे खरेदी करू नयेत किंवा घरी आणू नयेत. असे मानले जाते की अशी रोपे घरात आणल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह निर्माण होऊ शकतो.

वाईट सवयींपासून दूर राहा -

या दिवशी सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी आणि सवयी टाळल्या पाहिजेत. जुगार, चोरी, खोटे बोलणे, भांडणे, दारू पिणे, कांदा, लसूण, मांसाहार हे देवी लक्ष्मीला अप्रिय आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही देवीच्या कृपेपासून वंचित राहू शकता.

कोणालाही कर्ज देऊ नका - 

या दिवशी सोने, चांदी, नवीन वाहने इत्यादी घरी आणण्याचा दिवस आहे. अगदी आवश्यक नसल्यास, कोणालाही पैसे उधार देणे टाळावे. असे केल्याने, लक्ष्मी घरात येण्याऐवजी घराबाहेर पडू शकते.

Disclaimer: या लेखात नमूद केलेले उपाय/फायदे/सल्ला आणि विधाने केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. लेटेस्टली मराठी या लेखातील वैशिष्ट्यांमध्ये लिहिलेल्या गोष्टींना समर्थन देत नाहीत. या लेखात असलेली माहिती विविध स्रोत/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/धार्मिक ग्रंथ/दंतकथा यातून गोळा केली आहे. वाचकांना विनंती आहे की त्यांनी लेखाला अंतिम सत्य किंवा दावा मानू नये.