
1 जुलै हा दिवस 'राष्ट्रीय डॉक्टर्स डे' म्हणून साजरा केला जातो. भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.डॉक्टरांचे स्थान आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खुप महत्वाचे आहे.डॉक्टर हा एक देवमाणूस मानला जातो. गेल्या वर्षीपासून सुरु झालेल्या कोरोना महामारीमध्ये डॉक्टरांनी स्व:च्या जीवाची पर्वा न करता मोलाची कामगिरी केली होती आणि अजूनही ते करत आहेत. त्यामुळे आपण डॉक्टरांचे मानू तेवढे आभार कमीच आहेत. (National Doctor's Day 2021: 1 जुलै रोजी का साजरा केला जातो राष्ट्रीय डॉक्टर्स डे? जाणून घ्या महत्व, इतिहास आणि सेलीब्रेशन!)
'डॉक्टर्स डे' या दिवसाचे औचित्य साधून, तुमच्या ओळखीच्या, आजूबाजूच्या डॉक्टरांना WhatsApp Stickers, Quotes, Messages, Wallpapers, Greetings आणि HD Images च्या माध्यमातून शुभेच्छा द्या.





डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला, तर मृत्यू 1 जुलै 1962 रोजी झाला. केंद्र सरकारने 1991 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली.