National Doctor's Day 2021: 1 जुलै रोजी का साजरा केला जातो राष्ट्रीय डॉक्टर्स डे? जाणून घ्या महत्व, इतिहास आणि सेलीब्रेशन!
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

National Doctor's Day 2021:  देशातील प्रसिद्ध चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी असल्याने भारतात 1 जुलै रोजी राष्ट्रीय चिकित्सक दिवस साजरा केला जातो. तर जाणून घ्या 1 जुलै रोजी दिवसाचे महत्व, इतिहासासह आणखी काही गोष्टींबद्दल अधिक.(Statistics Day 2021: 29 जून 2021 या दिवशी सांख्यिकी दिन होणार साजरा)

सध्याची कोरोनाचे महासंकट पाहता प्रत्येकाच्या मनात याबद्दल भीती निर्माण झाली आहे. तर कोरोनाच्या काळात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु तरीही कोरोनाच्या विरोधातील लढाई अद्याप सुरुच आहे. त्याचसोबत देशभरातील डॉक्टर्स, नर्स आणि अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी अहोरात्र रुग्णांची सेवा करताना दिसून येत आहेत. दुसऱ्या बाजूला रुग्णालयात जाऊन अधिक गंभीर प्रकृती निर्माण होईल अशी भीती बाळणारे काहीजण घरीच आयसोलेशनमध्ये राहणे पसंद करत आहेत. पण डॉक्टरांकडून त्यांना नेहमीच सहकार्य केले जात आहे.

जोखिमेच्या परिस्थितीत सुद्धा आपल्या कर्तव्यांचे पालन करणे

कोरोनाच्या काळात लोकांना एक गोष्ट स्पष्टपणे कळली आहे की, डॉक्टरांचे आयुष्य हे किती जोखिमेचे असते. संक्रमित रुग्णाला बरे करुन घरी पाठवण्यासाठी ते त्यांचे सेवा करण्यात व्यस्त असतात. पण रुग्णांची सेवा करताना सुद्धा कोरोना झाल्याने काही डॉक्टरांनी सुद्धा आपला जीव गमावला आहे. त्यामुळे यंदाच्या डॉक्टर्स डे दिनिमित्त त्यांचा सन्मान करण्यासह त्यांच्या कामाचे कौतुक केल्यास त्यांना आनंद होईल.

भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स डे कधी?

कोलकाता मधील सन्मानित चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा जन्म (1882) आणि निधन (1962) मध्ये 1 जुलै रोजीच झाले होते. त्यामुळे त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो.

डॉक्टर्स डे सेलिब्रेशन

वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टरांचे योगदान सध्याच्या परिस्थितीत फार मोठे आहे. तर काही ठिकाणी डॉक्टरांकडून फ्री मेडिकल कॅम्प भरवले जातात. जेणेकरुन एखाद्या आजारबद्दल त्यांना मोफत उपचारासह जनजागृती डॉक्टरांकडून केली जाते. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही डॉक्टरांना एखादे फुल, फुलांचा बुके किंवा शुभेच्छापत्रक देत त्यांचे आभार तुम्ही मानू शकता.

इतिहास आणि महत्व

1882 मध्ये पटना बंगाल प्रेसीडेंट, ब्रिटिश भारतात जन्मलेल्या डॉ. बिधान चंद्र रॉय चिकित्सक, एक स्वातंत्र्य सेनानी, एक शिक्षण विद्ववते आणि एक राजनीतिज्ञ होते. देशाच्या प्रति त्यांचे समर्णण आणि सेवाभाव पाहता 1991 मध्ये डॉक्टर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, डॉ. बिधान चंद्र रॉय यांनी 1948 ते 1962 दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळली. काउंसिल ऑफ इंडिया आणि इंडियन मेडिकल असोसिएशन प्रत्येक 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा करतात. या दिवशी देशातील डॉक्टरांच्या कार्याचे आभार मानले जातात.