Doctor's Day 2020 HD Images: भारतात 1 जुलै रोजी आणि अमेरिकेत 30 मार्च रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ (Doctor's Day 2020) साजरा केला जातो. सर्व डॉक्टरांच्या सेवेबद्दल आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतात दरवर्षी 1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्याचा हा इतिहास खूप अभिमानास्पद आहे. आयुष्यात डॉक्टरांचे स्थान किती महत्वाचे आहे, हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. डॉक्टर हा एक देवमाणूस मानला जातो. सध्या कोरोना व्हायरस महामारीच्या काळात तर डॉक्टर जनतेसाठी किती मोठ्या प्रमाणात झटत आहेत याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. तर अशा या डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतात 1 जुलै रोजी ‘डॉक्टर दिवस’ साजरा होतो.
अजून एक गोष्ट म्हणजे, 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' हा भारताचे एक निष्णात चिकित्सक आणि भारतरत्न पुरस्काराचे मानकरी डॉ. बिधानचंद्र रॉय (Dr. B.C. Roy) यांच्या सन्मानार्थ आणि त्यांना श्रद्दांजली म्हणून त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी म्हणजे 1 जुलै रोजी साजरा होतो. डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला, तर मृत्यू 1 जुलै 1962 रोजी झाला. केंद्र सरकारने 1991 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली. तर या दिवसाचे औचित्य साधून, तुमच्या आजूबाजूच्या डॉक्टरांना WhatsApp Stickers, Quotes, Messages, Wallpapers, Greetings आणि HD Images च्या माध्यमातून शुभेच्छा द्या. राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा मराठी Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन कोरोना योद्ध्यांचे माना आभार
डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
डॉक्टर दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
डॉक्टर दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा!
सर्व डॉक्टरांना आज मनापासून धन्यवाद!
Uncountable Thanks to All The Doctors,
Who Work Around The Clock, Day and Night
दरम्यान, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात डॉक्टर महत्वाची भूमिका निभावतात. अगदी लहान सहन सर्दी-खोकला असो वा कोणतेही मोठी क्रिटीकल समस्या, प्रत्येकवेळीच डॉक्टर आपल्या कौशल्याची बाजी लावून रुग्णांचे प्राण व्हाचावायाचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सन्मान ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असावी. याच उद्देशाने भारत सरकारने 'राष्ट्रीय डॉक्टर्स डे' ही जनजागृती मोहीम म्हणून सुरू केली आहे. यामुळे सामान्य लोकांना डॉक्टरांची भूमिका, महत्त्व आणि ते घेत असलेली आपली मौल्यवान काळजी याची जाणीव होते. यासोबतच डॉक्टरांचा हा वार्षिक उत्सव सर्व डॉक्टरांच्या प्रोत्साहनाचा दिवस आहे.