यूनाइटेड अरब अमिराती (UAE)मध्ये यंदाची दिवळी पहिल्यांदाच काहीशा हटके पद्धतीने साजरी करण्यात आली. दुबई सरकारने भारताचे काऊन्सिलेट जनरल यांच्यासोबत पहिल्यांदाच तब्बल 10 दिवस दिवाळी साजरी केली. यूएईचे मुख्य शहर असलेल्या दुबई शहरातही दिवाळीचा जोरदार उत्साह दिसत आहे. खास करुन जगातील सर्वात उंच अशी ओळख असलेली इमारत बुर्ज खलीफा दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली. दुबईमध्ये सुमारे 25 लाख भारतीय लोक राहतात. दुबई पोलीसांचे बँडपथक भारताचे राष्ट्रगीत वाजवताना पहिल्यांदाच पाहायला मिळाले. युएईस्थित भारतीयांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.
दुबईमध्ये 1 ते 10 नोव्हेंबर(शनिवार)पर्यंत दिवाळीचा उत्साह कायम राहणार आहे. दरम्यान, युएईचे उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम यांनी हिंदीमध्ये ट्विट करुन भारतीयांना दिवाळी शुभेच्छा दिल्या. (हेही वाचा, अमेरिका: व्हाईट हाऊसवर यंदा दिवाळी नाही; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंधरा वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत)
दरम्यान, जगातील सर्वात उंच अशी ओळख असलेली बुर्ज खलीफा दिव्यांच्या रोषणानाईने उजळून निघाली. तर, दुबईतील बॉलिवूड पार्कमध्ये कलाकार बॉलिवूडच्या गाण्यांवर भांगडा करताना दिसले.
दिवाली के शुभ अवसर पर भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी @narendramodi और सभी मनानेवालों को मेरे और UAE वासीओं की ओर से हार्दिक शुभकामनायें!
सद्भावना और आशा का प्रकाश आजीवन हमारे साथ रहे।
कृपया UAE में अपनी दिवाली की तस्वीरें हमारे साथ share करें। #UAEDiwali
— HH Sheikh Mohammed (@HHShkMohd) November 7, 2018
युएईचे उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम यांनी हिंदीमध्ये ट्विट करुन भारतीयांना दिवाळी शुभेच्छा दिल्या.
wishes everyone celebrating #Diwali a happy and joyful festival. #UAEDiwali #برج_خليفة يتمنى لجميع المحتفلين بالديوالي مهرجان سعيد pic.twitter.com/jSaQ0UTKmG
— Burj Khalifa (@BurjKhalifa) November 7, 2018
अमिराती एअरलाईन्सने ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक भारतीयांनी लाईक आणि शेअरही केला आहे.
This year, we are celebrating the Indian festival of lights like never before. Emirates wishes you a vibrant, joyful and prosperous Diwali. #HappyDiwali pic.twitter.com/sVn6IIrQrl
— Emirates Airline (@emirates) November 6, 2018
दुबई टुरिजम डिपार्टमेंटने दिवाळी सेलिब्रेशनचे काही व्हिडिओही ट्विट केले आहेत. याशिवाय अमिराती एअरलाईननेही आपल्या खास अंदाजात दिवाळी साजरी केली. सांगितले जाते की, युएईच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतियांश (25 लाख) जनता ही भारतीय आहे.