Rangoli Designs (Photo Credits-Facebook)

Diwali Easy  Rangoli Designs: दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भारतात साजरया केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सवाच्या दृष्टीने सर्व धार्मिक लोक दिवाळी मोठ्या आनंदात साजरा करतात. दिवाळी म्हटले की; रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. यंदा 25 तारखेला वसूबारस साजरा करण्यात आल्यानंतर 27 तारखेला दिवाळीची पहिली पहाट असणार आहे.दरवर्षी दिवाळीच्या रात्रीत जगमगते दिवे, रोषणाईसह फटाक्यांमुळे या सणाला चारचांद लागले जातात. तसेच घराला सजावटीसह फराळ बनवला जातो.

दिवाळीच्या पाच दिवसांनी सुरुवात ही धनत्रयोदशी पासून होते. या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात. पारंपारिक रितीनुसार आणि तज्ञांच्या मते दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे लोक सोने चांदी खरेदी करतात. त्यामुळे ज्वेलरीच्या दुकानावर मोठी गर्दी करताना दिसून येतात.

दिवाळीला आम्रपर्णाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात अशाप्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते की, रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते. तसेच घराच्या पुढे काढलेली रांगोळी घराचे आकर्षण दिवाळीदरम्यान अधिक वाढते. (Diwali 2019 Calendar: धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ते भाऊबीज पहा यंदा दिवाळी मध्ये कोणता सण कधी?)

तर यंदाच्या दिवाळीला अंगणात सुरेख रांगोळी काढण्यासाठी पहा 'या' सोप्या पद्धती:

रांगोळी काढण्याची सोपी पद्धत: 

फुलांची रांगोळी: 

पणत्यांची आरास असलेली रांगोळी: 

सोपी आणि आकर्षक रांगोळी डिझाइन: 

दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात दिवाळीचा सण साजरा केला होता.