Dhulivandan 2022 Messages: होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी लोक मोठ्या उत्सवात रंग खेळतात. या दिवशी सर्व व्यथा विसरून एकमेकांच्या रंगात रंगून जातात. धुलिवंदन हा सण धुलंडी, धुरड्डी, धुरखेल किंवा धुलिवंदन या नावांनी देखील ओळखला जातो.
पुराणातही धुलेंडी सणाचा उल्लेख आढळतो. यानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथीला धुलेंडीचा सण साजरा केला जातो. धुलिवंदनच्या निमित्ताने मराठी Greetings, Wishes Images, WhatsApp Stickers द्वारे आपल्या मित्र-परिवारास खास मराठी शुभेच्छा द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. तुम्ही या ईमेज आपल्या नातेवाईकांना तसेच मित्र-परिवाराला पाठवून त्यांना धुलिवंदनाच्या खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. (वाचा -Dhulivandan Wishes In Marathi: होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा Quotes, Messages द्वारा शेअर करत धुलिवंदन करा खास)
पाणी जपुनिया,
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा
धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
धुलिवंदनच्या तुम्हाला
आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा…!!!
“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा
आनंद लुटणे म्हणजे होळी होय!
तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे,
कोरडे झाले ओले एकदा रंग लागले
तर सर्व होतात रंगीले
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हा उत्सव साजरा करण्यामागे दोन कथा प्रचलित आहेत. पहिल्या कथेनुसार धुलुंडीच्या दिवशी भोलेनाथने कामदेवाची तपश्चर्या भंग करण्याच्या प्रयत्नात भस्म केले होते. पण देवी रतीच्या विनंतीवरून त्यांनी कामदेवाला क्षमा दिली आणि पुनर्जन्म घेतला. यासोबतच देवी रतीला श्रीकृष्णाची कन्या म्हणून जन्म घेण्याचे वरदान दिले होते. कामदेवाच्या पुनर्जन्माच्या आणि देवी रतीकडून मिळालेल्या वरदानाच्या आनंदात जगभर फुलांचा वर्षाव झाला. त्यामुळे हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.