
काल 17 मार्च रोजी देशभरात होळीचा (Holi 2022) सण झाला, आता आज, 18 मार्च 2022 रोजी महाराष्ट्रामध्ये धूळवड खेळली जाईल. होळीच्या दुस-या दिवशी धूलिवंदन (Dhulivandan 2022) हा सण साजरा केला जातो. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमेचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेस धुळवड साजरी केली जाते. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावतात. होळी साजरी केलेल्या ठिकाणी स्त्रिया घरातील पाणी हंड्यात, घागरीत भरून ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापवले जाते. त्या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालण्याची प्रथा आहे.
प्रथेनुसार, होळी दिवशी जगातील सर्व वाईट विचार व वाईट गोष्टी जाळल्या जात असत. त्याची राख मातीत मिसळली जात असे. धुलिवंदनाच्या दिवशी ज्या मातीतून आपण जन्म घेतला त्या मातीला वंदन करण्यासाठी हीच राख अंगाला लावण्यात येत असे. तर अशा या धुलीवंदनाच्या दिवशी काही HD Greetings, Wallpapers, Wishes, Images च्या माध्यमातून आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना शुभेच्छा द्या आणि जोमात साजरी करा धुळवड.





(हेही वाचा: मुंबईमध्ये अनेक ठिकाणी होळी पार्ट्यांचे आयोजन; जाणून घ्या ठिकाणे आणि वेळ)
दरम्यान, महाराष्ट्रात होळी हा सण होळी पौर्णिमा ते रंगपंचमीच्या दिवसापर्यंत साजरा केला जाणारा सण आहे. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. काही भागात धुलीवंदनाच्या दिवशीच रंगही खेळला जातो, परंतु महाराष्ट्रात होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी साजरी होते.