
Dhulivandan 2021 Wishes: होलिका दहन केल्यानंतर दुसर्या दिवशी धूलिवंदन सण साजरा केला जातो. धुलेंडी हा सण धुलंडी, धुळवड, धुरड्डी, धुरखेळ, किंवा चैत बदी आदी नावांनी ओळखला जातो. धुलिवंदन हा एक रंगांचा उत्सव असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. धुलिवंदनाचा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावतात. धुलिवंदनाचा सण साजरा केल्यानंतर 15 दिवसांनी नववर्षाची म्हणजे पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे.
यावर्षी धुलिवंदनाचा सण 29 मार्च म्हणजेच सोमवारी साजरा होणार आहे. धुळेडीच्या दिवशी लोक एकमेकांवर रंग किंवा गुलाल लावतात. यंदा होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर कोरोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करून धुलिवंदनाचा सण साजरा करावा लागणार आहे. तुम्ही सोशल मीडियावर धुलिवंदननिमित्त मराठमोळे Messages, Greetings, Images, WhatsApp Stickers च्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणीला आणि परिवाराला खास शुभेच्छा देऊ शकता. (वाचा - Holi 2021 Eco-Friendly Colours: केमिकल युक्त रंग आपल्या केसांना आणि त्वचेला हानी पोहचवतात; घरच्याघरी नैसर्गिक रंग बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या (Watch Video))
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
ही होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात, पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो…
होळी व धुलिवंदनच्या तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !

रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा, रंग आपुलकीचा,
रंग बंधांचा, रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा,
रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा होळी व धुलिवंदनच्या तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !

होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची,
भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा,
तुम्हाला सर्वांना होळीच्या व धुलिवंदनच्या खूप खूप शुभेच्छा!

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा
आनंद लुटणे म्हणजे होळी होय!
तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.
तुम्हाला होळी आणि धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी व धुलिवंदनच्या तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !

दरम्यान, त्रैतायुगाच्या प्रारंभमध्ये विष्णूंने धूलिवंदन केले होते. याच आठवणीत धुलेंडी साजरी केली जाते. धूलिवंदनाच्या दिवशी लोक एकमेकांवर चिखल, धूळ फेकतात. महाराष्ट्रात होलिका दहन केल्यानंतर पुढील पाच दिवस धुळवड आणि रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो.