Happy Dhanteras 2022 Wishes : धनत्रयोदशीच्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारा शेअर करत साजरा करा धनतेरस
Dhantrayodashi 2022 Messages (PC - File Image)

Dhanteras 2022 Wishes in Marathi: रविवार, 23 ऑक्टोबर रोजी धनतेरसचा सण साजरा होणार आहे. धनतेरस हा दोन शब्दांपासून बनलेला आहे. पहिला धन आणि दुसरा तेरस म्हणजे संपत्तीच्या तेरा पट. भगवान धन्वंतरीच्या दर्शनामुळे वैद्य समाज हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून साजरा करतात. शास्त्रात सांगितल्यानुसार, समुद्रमंथनाच्या वे भगवान धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. ज्या तिथीला भगवान धन्वंतरी महासागरातून निघाले ती कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी होती. भगवान धन्वंतरी समुद्रातून कलश घेऊन अवतरले होते. त्यामुळे या निमित्ताने भांडी खरेदी करण्याची परंपरा सुरू आहे.

धनतेरस निमित्त Messages, Images, WhatsApp Status, Greetings च्या माध्यमातून या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Rangoli Design For Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या शुभ प्रसंगी काढा सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ)

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो

निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो

ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची

आणि भरभराटीची जावो

धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा

Dhantrayodashi 2022 Messages (PC - File Image)

दिव्यांची रोषणाई

फराळाचा गोडवा

अनोखी अपूर्वाई

अन् धनत्रयोदशीचा सोहळा!

सर्वांना धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhantrayodashi 2022 Messages (PC - File Image)

आला आला दिवाळीचा सण

घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण

दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी

धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी

धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!

Dhantrayodashi 2022 Messages (PC - File Image)
लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख-समृद्धी व शांती घेऊन तुमच्या घरी

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

Dhantrayodashi 2022 Messages (PC - File Image)

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा

घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा

Dhantrayodashi 2022 Messages (PC - File Image)

धनतेरस सणानिमित्त वरील मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter, इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शुभेच्छा देऊ शकता.