Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits: File Image)

Dhamma Chakra Pravartan Din 2020 Messages: उद्या म्हणजेच 23 ऑक्टोबरला बौद्ध बांधवांसाठी खास असलेला धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Day 2020) साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी काही बौद्ध बांधव तारखेप्रमाणे तसेच तिथीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतात. त्यानुसार, 14 ऑक्टोबर रोजी तारखेनुसार धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. तर 25 ऑक्टोबर रोजी तिथीप्रमाणे धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची प्रथा आहे. धम्म चक्र प्रवर्तनाच्या दिवशी बौद्ध बांधव नागपूर येथील दीक्षाभूमीमध्ये एकत्र जमतात. येथे ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B. R. Ambedkar) यांच्या स्मृतीला अभिवंदन करतात. या दिवशी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील बौद्ध अनुयायी नागपूरला येतात. मात्र, यंदा या दिवसावर कोरोना विषाणूचे सावट आहे. त्यामुळे सरकारने घालून दिलेल्या अटीनुसार यावर्षी बौद्ध अनुयायांना धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करावा लागणार आहे.

धम्म चक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यामागे मोठा इतिहास आहे. अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केले. तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त Messages, Images, SMS, WhatsApp Status शेअर करून बौद्ध बांधवांना खास मराठी शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील संदेश नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Happy Dussehra 2020 Wishes In Marathi: दस-याच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन उत्साहात साजरी करा यंदाची विजयादशमी!)

काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य

परिवर्तनाच्या दिशेने चालण्याचे घेऊन धैर्य

एकमुखाने गात भीमरायाचे शौर्य

सोबतीने पार पाडू धम्मप्रसार कार्य

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits: File Image)

बुद्धाच्या चरणावरती

विजयादशमी दिनी

दिक्षा आम्हा दिली भीमाने

मंगल दिन तो जनी

आपणा सर्वांना या खास दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!

Dhamma Chakra Pravartan Din 2020 Messages (Photo Credits: File Image)

बुद्धं शरणं गच्छामि

धम्मं शरणं गच्छामि

संघं शरणं गच्छामि

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Dhamma Chakra Pravartan Din 2020 Messages (Photo Credits: File Image)

गौतमाचा प्रकाश घेऊन अंतरी

पसरवूया अशोकचक्र साऱ्या जगावरी

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhamma Chakra Pravartan Din 2020 Messages (Photo Credits: File Image)
Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits: File Image)

दरम्यान, इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती. त्यामुळे आंबेडकरांनीदेखील अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले. डॉ आंबेडकरांनी 14 आक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये आपल्या 5,00,000 अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. तेव्हापासून आतापर्यंत बौद्ध अनुयायी हा दिवस धम्म चक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतात.