आषाढ महिन्यातील अमावस्या ही दीपपूजा अमावस्या (Deep Puja Amavasya) म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे. यंदा 29 जुलैला श्रावण मासारंभ होत असल्याने 28 जुलै दिवशी आषाढ अमावस्या अर्थात दीपपूजा अमावस्या साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक असल्याने या महिन्याच विशेष आकर्षण असतं. मग या महिन्याच्या आदल्या विषयी दीपपूजा करून नव्या महिन्याच्या स्वागताला तयार व्हा. तिमिराकडून तेजाकडे नेणारा दिवा हा आपल्या संस्कृतीमध्ये पूजनीय आहे. मग यंदा आषाढ अमावस्येला दीपपूजा अमावस्या साजरी करत दिव्यांची पूजा करत दीपापूजा अमावस्येच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना देण्यासाठी ही मराठमोळी ग्रिटिंग्स नक्की शेअर करा.
पावसाळ्याच्या दिवसात काळोख दाटलेला असतो. अशा काळी घरातील दिवे घासून पुसून त्यांना नीट तेलपाणी देण्यासाठी दिव्यांची आरास करून त्यांचं पूजन करण्याची रीत असावी असा जुन्या- जाणत्या लोकांचा अंदाज आहे. नक्की वाचा: Deep Amavasya 2022 Date: दीप अमावस्या यंदा 28 जुलै दिवशी जाणून घ्या दीप पूजेचे महत्त्व!
दीपपूजा अमावस्या 2022 शुभेच्छा
घरात सणा-समारंभाला समई, नंदादीप, दिवे, पणत्या प्रज्वलित केल्या जातात. दीप पूजेच्या निमित्ताने त्या पुन्हा नीट साफ करून त्यांची पूजा करण्याची रीत आहे. यासाठी चौरंगावर लाल कापड पसरून दिवे ठेवून ते प्रज्वलित करून पूजा केली जाते. चौरंगाभोवती फूलांची आरास करण्याची, रांगोळी काढण्याची देखील पद्धत आहे. या निमित्ताने पुढे येणार्या श्रावण महिन्याचं स्वागत केले जाते.