Deep Amavasya 2019 Wishes and Messages: दीप अमावस्येच्या शुभेच्छा WhatsApp,Facebook च्या माध्यामातून शेअर करून साजरी करा यंदाची आषाढी अमावस्या
Deep Amavasya Wishes (File Photo)

Deep Amavasya 2019: आषाढ अमावस्या संपल्यानंतर श्रावण महिन्याला सुरूवात होते. श्रावण हा हिंदू पंचांगामधील पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये अनेक व्रत-वैकल्य असल्याने मांसाहार, मद्यपान टाळण्याचा सल्ला दिला जातो. या पवित्र महिन्याची सुरूवात करण्यापूर्वी आषाढ अमावस्येला दीव्यांची पूजा करून नव्या महिन्यासाठी घर सज्ज केले जाते, त्यामुळे आज आषाढ अमावस्या ही दीप अमावस्या (Deep Amavasya) म्हणून देखील साजरी केली जाते. दीप हे भारतीय संस्कृतीमध्ये मांगल्याचे प्रतिक समजले जाते. त्यामुळे घरात आज जुन्या दिव्यांची आरास केली जाते. प्राचीन काळापासून दीप अमावस्येला कणकेचे दिवे बनवूनही पूजा देवघरात पूजा केली जाते. Deep Amavasya 2019: दीप अमावस्या का आणि कशी साजरी करतात?

2 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी आज तुमच्या कुटुंबीयांना घरातील इडा पीडा टळो आणि घरात सुख, समृद्धी, मांगल्य नांदो यासाठी प्रार्थना करून शुभेच्छा देण्यासाठी ही खास ग्रिटिंग्स शेअर करा.

दीप अमावस्या शुभेच्छा

Deep Amavasya Wishes (File Photo)
Deep Amavasya Wishes (File Photo)
Deep Amavasya Wishes (File Photo)
Deep Amavasya Wishes (File Photo)
Deep Amavasya Wishes (File Photo)

दीप अमावस्येच्या शुभेच्छा देणारे व्हॉट्सॅप फॉरवर्ड्स

*दीप अमावस्या*

आज दीप पूजा.

तुमच्या कुटूंबियांच्या

आयुष्यातील अंधःकार नष्ट होऊन ज्ञान;

आरोग्य; ऐश्वर्य; शांती व सौख्याचा प्रकाश

जीवनात अविरत प्राप्त होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

दिव्याने दिवा लागत गेला की दिव्याची एक दीपमाळ तयार होते

फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार होतो

माणसाला माणूस जोडत गेलं की एक माणूसकीचं एक सुंदर नातं तयार होतं

दीप अमावस्येच्या शुभेच्छा

दीप अमावस्या 

आषाढी अमावस्या 31 जुलै दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून 1 ऑगस्टच्या सकाळी 8.42 मिनिटांपर्यंत आहे.

आषाढ अमावस्येला दीप अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. मात्र ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणूनच सेलिब्रेशन करण्याकडे अधिक कल असल्याने त्यामागील शास्त्र हळूहळू मागे पडत चालले आहे. आज दीप अमावस्येदिवशी तुमच्या आयुष्यातील निराशेचा, अज्ञानाचा अंधार दूर होवो!