
Dahi Handi 2023 Messages: संपूर्ण देशात ‘जन्माष्टमी’ (Krishna Janmashtami 2023) हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून हा उत्सव साजरा होतो. भगवान कृष्ण हे श्री विष्णू किंवा नारायणाचा आठवा अवतार आहेत, जे त्रिमूर्तींपैकी एक आहे. यंदा देशात देशात 6 आणि 7 सप्टेंबरच्या रात्री श्रीकृष्णा जन्माष्टमी साजरी झाली व त्यानंतर आज, 7 सप्टेंबरला ठिकठिकाणी दहीहंडी (Dahi Handi 2023) फोडली जाणार आहे. महाराष्ट्रात लोक दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. राज्याची राजधानी मुंबईत अनेक दहीहंडी स्पर्धा आयोजित केल्या जातात.
श्रीकृष्ण लहानपणी अतेशय खोडकर होते. ते आपल्या मित्रांसह गोपींच्या घरातून दही, तूप, लोणी असे पदार्थ चोरत असत. कृष्ण आणि त्याच्या टोळीचा उपद्रव थांबवण्यासाठी अशा पदार्थांची हंडी उंचीवर टांगली जात असत. मात्र कृष्ण आणि त्याचे मित्र मानवी मनोरा उभारून या हंड्यांपर्यंत पोहोचत असत. या घटनेच्या स्मरणार्थ गोविंदा दहीहंडी उत्सव साजरा करतात.
तर दहीहंडीच्या या खास प्रसंगी तुम्ही Greetings, Wallpapers, Wishes, Messages शेअर करुन आपल्या मित्र-परिवारास शुभेच्छा देऊ शकता.






दरम्यान, दहीहंडीच्या दिवशी मातीची मोठी हंडी खूप उंचावरून टांगली जाते. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला आवडलेल्या सर्व गोष्टी- दुध, दही, लोणी, मिठाई, साखर, तूप, फळे, मिठाई, पोहे इ. पदार्थ भरले जातात. त्यानंतर एकमेकांच्या खांद्यावर चढून, म्हणजेच मानवी मनोरे रचून ही हंडी फोडली जाते. हंडी फुटल्यानंतर त्यातील पदार्थ प्रसाद म्हणून खाल्ले जातात. (हेही वाचा: Chief Minister Dahi Handi Utsav: ठाण्यात कोपरी शिवसेनेतर्फे 'मुख्यमंत्री दहीहंडी उत्सवा'चे आयोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुत्र श्रीकांत शिंदे यांना निमंत्रण)
श्रीकृष्ण गायी चारताना स्वत:ची व सवंगड्यांनी घरून आणलेल्या शिदोर्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला करुन सर्वांसह भक्षण करत असे. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.