भारतामध्ये 10 मार्च हा दिवस CISF चा 54 वा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांना अर्धसैनिक असून सरकारी कारखाने आणि अन्य सरकारी उपक्रमांमध्ये सुरक्षा प्रदान करण्यासाठी नेमलं जातं. गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ते येतात. दिल्लीमध्ये त्यांचं मुख्यालय असून दरवर्षी 10 मार्च दिवशी या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचा स्थापना दिवस साजरा केला जातो. मग या दिवसाचं सेलिब्रेशन तुमच्या प्रियजनांसोबत, नित्रमंडळींसोबत सोशल मीडीयात Messages, Greetings, WhatsApp Status शेअर करत करायचे असल्यास ही खास शुभेच्छापत्र तुम्ही नक्कीच शेअर करू शकता.
सीआईएसएफ स्थापना दिवसाचं औचित्य साधत लोकं आपल्या कर्मचार्यांना सन्मान म्हणून प्रेरक आणि देशभक्ती पर शुभेच्छा संदेश देऊन एकमेकांचा उत्साह वाढवला जातो. नक्की वाचा: निमलष्करी दलांमध्ये तृतीयपंथीयांनाही संधी मिळणार? केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध विभागांकडून मागवल्या सूचना .
सीआईएसएफ स्थापना दिवसाच्या शुभेच्छा
सीआईएसएफ हे भारतातील एक केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. ते 10 मार्च 1969 रोजी भारतीय संसदेच्या कायद्यानुसार 2,800 जणांसोबत स्थापन करण्यात आले होते. CISF नंतर 15 जून 1983 रोजी पारित झालेल्या संसदेच्या दुसर्या कायद्याद्वारे भारतीय प्रजासत्ताकाचे ते सशस्त्र दल बनले आहे. तेव्हापासून, CISF स्थापना दिवस दरवर्षी 10 मार्च रोजी साजरा केला जातो.