
सीआईएसएफ स्थापना दिवस दरवर्षी 10 मार्च दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1969 साली या दलाची स्थापना झाली आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दिल्लीतील त्यांच्या मुख्यालयामध्ये 10 मार्च दिवशी जोषपूर्ण वातावरणामध्ये सीआईएसएफ दिवस साजरा केला जातो. दरम्यान केंदीय औद्योगिक सुरक्षा दलाचे हे कर्मचारी अर्धसैनिक असून सरकारी कारखाने आणि अन्य सरकारी उपक्रमांमध्ये सुरक्षा प्रदान करण्याचं काम त्यांच्याकडून केले जाते. मग यंदा 52 व्या सीआईएसएफ स्थापना दिवसाचं औचित्य साधत या सुरक्षा कर्माचार्यांना HD Images, Wishes, Messages, Greetings च्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी टीम लेटेस्टली कडून बनवण्यात आलेली ही शुभेच्छापत्र नक्की शेअर करायला विसरू नका.
सीआईएसएफ स्थापना दिवसाचं औचित्य साधत लोकं आपल्या कर्मचार्यांना सन्मान म्हणून प्रेरक आणि देशभक्ती पर शुभेच्छा संदेश देऊन एकमेकांचा उत्साह वाढवला जातो.




CISF च्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा देखील वापर करू शकता. यासाठी तुम्हांला गूगल प्ले स्टोअर मधून व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा पॅक डाऊनलोड करावा लागणार आहे. दरम्यान आजचा दिवस हा सीआईएसएफ च्या जवानांच्या बहादुरीला आणि वीरतेला सलाम करण्याचा आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी नक्कीच एक पाऊल पुढे या!