Christmas 2018: डिसेंबरचा शेवटचा आठवडा हा ख्रिस्मस (Christmas) म्हणजेच नाताळ (Natal) , नववर्ष यांच्या सेलिब्रेशनमध्ये रंगलेला असतो. 24 डिसेंबरच्या मध्यरात्री ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जाऊन येशूची प्रार्थना करतात. 24 तारखेच्या रात्रीच लहान मुलं नवा कोरा मोजा बेडजवळ ठेवतात. सांताक्लॉज (Santa Claus) या रात्री मोज्यामध्ये गिफ्ट ठेवून जातो. असा त्यांचा समज असतो. त्यामुळे आबालवृद्धांमध्ये कुतुहल असणारा हा सांताक्लॉज म्हणजे नेमका कोण ? हे तुम्हांला ठाऊक आहे का?
सांताक्लॉज (Santa Claus) म्हणजे कोण ?
पांढर्या दाढी, मिशा असणारा, लाल कपडे घालून, रेनडिअरच्या गाडीतून फिरणारा सांताक्लॉज हा त्याच्या पोतडीतून गिफ्ट्स आणतो असं आपण लहानपणापासून पाहिलयं, त्याच्याबद्दल आपण कितीही मोठे झालो तरीही कुतुहल कायम असतं म्हणूनच त्याच्याबददल या काही खास गोष्ट
प्राचीन मान्यतेनुसार, काही कथांनुसार असा समज आहे की सांताक्लॉजचं घर हे उत्तर ध्रुवावर आहे. तेथून सार्यांना गिफ्ट्स देण्यासाठी तो उडणार्या रेनडियर्सच्या गाडीवरून ख्रिस्मसच्या दिवसात फिरत असतो. Christmas 2018: Secret Santa ची सुरुवात कोणी केली ? काय आहे या परंपरेचे मूळ आणि इतिहास?
सांताक्लॉजचं आपल्या डोक्यात असणारं हे आधुनिक रूप 19 व्या शतकात अस्तित्वात आले, त्यापूर्वी असा कोणताच प्रकार अस्तित्त्वात नव्हता.
सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी संत निकोलस (St. Nicholas)यांचा जन्म झाला होता. संत निकोलसचा जन्म तिसर्या शतकात येशुंच्या मृत्युनंतर 280 वर्षांनंतर मायरा येथे झाला. ते एका श्रीमंत कुटुंबात जन्मले होते. त्यांनाच आपण सांता म्हणतो.
संत निकोलस आणि येशुंच्या जन्माचा कोणताच थेट संबंध नाही. पण आज सांताक्लॉजशिवाज ख्रिस्मस / नाताळ ही गोष्टच अपूर्ण आहे. साध्या गिफ्ट शॉपपासून, मॉल आणि अगदी कथा, कादंबर्यांमध्ये ख्रिस्मसच्या सेलिब्रेशनमध्ये सांताक्लॉज आहेच. Christmas 2018: ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेजेस आणि Santa Claus WhatsApp stickers
सांता गिफ्ट रात्रीच का देतो?
ख्रिस्मस, सांताक्लॉज आणि गिफ्ट हे अतुट नात आहे. या दिवसात सिक्रेट सांताच्या स्वरूपात असो किंवा लहान मुलं मोज्यामध्ये असो सांता गिफ्ट ठेवतो असा विश्वास असतो. संत निकोलस हे श्रीमंत कुटुंबात जन्मले होते. ते गरीबांना मदत करत असत, लहान मुलांना गिफ्ट देऊन आनंद देत असत मात्र हे काम करताना त्यांना त्यांची ओळख लपवायची होती. कोणीही आपल्याला पाहू नये अशी त्यांची इच्छा असल्याने रात्रीच्या वेळेस मध्यरात्रीच्या वेळ निवडत होते.