Happy Holidays 2018 Google Doodle (Photo Credits: Google Homepage)

Happy Holidays Google Doodle: 25 डिसेंबर हा ख्रिसमसचा (Christmas)  दिवस! येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस आणि सुटयांचा काळ सेलिब्रेट करण्यासाठी गुगलनेदेखील खास ख्रिसमस स्पेशल हॅप्पी हॉलिडे (HAPPY HOLIDAYS) गुगल डुडल शेअर केलं आहे. ख्रिसमसच्या दिवसात घर आणि ख्रिसमस ट्री ज्याप्रमाणे सजवली जाते त्याचप्रमाणे आज गुगल देखील सजल आहे. यामध्ये मिस्टर आणि मिसेस सांता ख्रिसमस गिफ्ट्सचं पॅकिंग करताना दिसत आहेत. आज गुगलचं होम पेज Happy Holidays च्या शुभेच्छा देणाऱ्या सर्च पेजने सजलेलं आहे. Christmas 2018: ख्रिसमस, नाताळ सणासाठी खास मराठी शुभेच्छापत्र आणि मेसेजेस!

गुगलने जगभरातील इतर देशांमध्ये 23  डिसेंबर पासूनच होम पेजवर ख्रिसमस सेलिब्रेशनला सुरुवात केली होती मात्र भारतामध्ये आज 25 डिसेंबर म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी सणाच्या आणि आगामी सुट्टयांच्या दिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जाऊन येशूची प्रार्थना करतात, त्यानंतर मित्रमंडळींसोबत मिठाई, केक वाटून, शुभेच्छा, ग्रीटिंग्स आणि भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात.  Christmas 2018: ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेजेस आणि Santa Claus WhatsApp stickers

Happy Holidays म्हणतं गुगलनेही यूज़र्सवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मग या आनंदाच्या सणामध्ये तुम्हीही सहभागी व्हा आणि सुट्टयांचा आनंद घ्या, ख्रिसमस साजरा करा.