
Happy Chocolate Day Gift Idea: व्हॅलेनटाईन वीक (Valentine Week) सुरु झाला असून येत्या 9 फेब्रुवारीला जगभरात चॉकलेट डे (Chocolate Day) साजरा केला जाणार आहे. 'चॉकलेट डे' निमित्त आपल्या पार्टरन किंवा मित्र-मैत्रिणीच्या प्रति प्रेमाची भावना दर्शवणारा हा दिवस असल्याचे मानले जाते. चॉकलेट हे नात्यात गोडवा आणण्यासोबत चेहऱ्यावर हास्य सुद्धा आणते. बाजारात विविध आकाराचे, रंगांचे आणि फ्लेवअर्स असणारे चॉकलेट्स उपलब्ध असतात. मात्र काही जणांचा डार्क चॉकलेट तर काही जणांना फक्त गोड चॉकलेट्स खाणे आवडते.सर्वांनाच मुलींना चॉकलेट फार पसंत असल्याने त्यांना गिफ्ट मध्ये कधी ही ते दिल्यास त्या आनंदी होतात. तर काही जण आपल्या प्रिय व्यक्तीला चॉकलेट एका विशिष्ट पद्धतीने सजवून त्यासोबत डेटी बेअर किंवा गुलाबाचा गुच्छ देऊ करतात. त्यामुळे मुलींना या सर्व गोष्टी चार्मिंग वाटून त्या आपल्या भावना मोकळेपणाने सांगतात.
तुमच्या पार्टनरला गिफ्ट द्यायचे असेल तर चॉकलेटचा बुके, मिनि चॉकलेट बॅग, चॉकलेट बॉक्स, हार्ट शेप चॉकलेट हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही यंदाच्या चॉकलेट डे निमित्त शुभेच्छा देण्यासोबत खास गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला त्यासाठी मदत करणार आहोत. चॉकलेट डे निमित्त गिफ्ट द्यायचे असेल तर या काही हटके आयडियाजाच जरुर वापरा.
>> तुमच्या प्रिय व्यक्तीला मेकअप किट असलेल्या पर्सनलाईज्ड केक यंदाच्या 'चॉकलेट डे' साठी गिफ्ट करु शकता.

>>आपल्या मित्र-मैत्रिणीला किंवा पार्टनरला चॉकलेट डे दिवशी खुश करायचे असेल तर चॉकलेट रॅपरवर एखादा छानसा मेसेज प्रिंट करुन तुम्ही देऊ शकता.

>>हार्ड शेप मधील चॉकलेट्स मुलींना फार आवडत असल्याने तुम्ही ते खरेदी करुन तुमची आयडिया वापरुन 'चॉकलेट डे' साठी गिफ्ट देऊ शकता.

>>रेड वाईन, चॉकलेट्स आणि गुलाबांच्या फुलांचा गुच्छ हे उत्तम कॉम्बिनिशन असून तुम्हाला यंदाचा चॉकलेट डे अधिक खास साजरा करायचा असेल तर हा उत्तम पर्याय आहे.

>>तुम्ही जर क्रिएटिव्ह मनाचे असाल तर एखादे ग्रिटिंग तयार करत त्यामध्ये तुमच्या भावना लिहिण्यासोबत कॅटबरी सुद्धा देत तुमच्या पार्टनरला करा खुश.

काही जण आपल्या प्रेमाचे संकेत देण्यासाठी पार्टनरला चॉकलेट देतात. चॉकलेट हे आरोग्यासाठी फार लाभदायी ठरते. एवढेच नाही तर महिलांना फुल किंवा ड्रिंक्स पेक्षा चॉकलेट्स सर्वाधिक आवडत असल्याचे एका सर्वे मध्ये समोर आले आहे.