
Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्मदिवस तिथीनुसार, फाल्गुन वद्य तृतीयेचा आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात तिथीनुसार शिवजयंती साजरी केली आहे. महाराष्ट्र सरकार कडून तारखेनुसार, 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याची प्रथा आहे. पण अनेक शिवभक्त तारखेनुसार आणि तिथीनुसार अशा दोन्ही पद्धतीने मोठ्या जल्लोषात शिवजयंतीचा सोहळा साजरा करतात. मग आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महारांजाप्रती आदर व्यक्त करत सोशल मीडीयात WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes, Photos, Slogans शेअर करत शिवजयंतीचा आनंद द्विगुणित करू शकता.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ दिवशी झाला. शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादा विरूद्ध लढून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसासाठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. नक्की वाचा: Shiv Jayanti 2025 Messages In Marathi: शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी Greetings, WhatsApp Status, Wishes!
शिवजयंतीच्या शुभेच्छा





शहाजीराजे आणि जिजामाता यांच्या पोटी जन्माला आलेल्या शिवरायांचे नाव शिवनेरी गडावरील शिवाई देवी वरून ठेवण्यात आले आहे. शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती.