Shiv Jayanti 2025 Messages In Marathi: शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी Greetings, WhatsApp Status, Wishes!
महाराष्ट्रात राज्य सरकार कडून शिवजयंती तारखेनुसार म्हणजे 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. मात्र तिथीनुसार शिवजयंती फाल्गुन वद्य तृतीया दिवशी साजरी करण्याची पद्धत आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्मदिवस तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी तर तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया दिवशी साजरा केला जातो. यंदा तिथीनुसारची शिवजयंती (Shiv Jayanti) 17 मार्च ला आहे. शिवरायांच्या जन्मदिनाचा सोहळा शिवभक्त रायगडावर साजरा करतात.पण त्यासोबतच जगाच्या कानाकोपर्यात विखुरलेला शिवप्रेमी तिथीनुसारही शिवजयंती साजरी करण्यासाठी महाराजांसमोर झुकतो.म्हणूनच यंदा तिथीनुसार शिवाजयंती साजरी करण्यासाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा, Messages, WhatsApp Status, Wishes तुम्ही सोशल मीडीयामध्ये शेअर करू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आदर व्यक्त करण्यासोबतच नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहचवण्यासाठी शिवजयंती साजरी केली जाते.
शिवजयंतीचं औचित्य साधत महाराजांच्या पराक्रम गाथा लहान मुलांना सांगितल्या जातात. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिवजयंतीचा मोठा सोहळा साजरा करत हा दिवस आनंदात साजरा केला जातो. मग हा आनंद तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत, आप्तेष्टांसोबत शेअर करण्यासाठी लेटेस्टलीने बनवलेली ही खास शुभेच्छापत्र तुम्ही डाऊनलोड करून शेअर करू शकता. Shiv Jayanti 2025 Wishes in Marathi: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त Messages, WhatsApp Status, Images, Quotes द्वारे प्रियजनांना द्या खास शुभेच्छा!
शिव जयंतीच्या शुभेच्छा





महाराष्ट्रात राज्य सरकार कडून शिवजयंती तारखेनुसार म्हणजे 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते.त्यादिवशी राज्यात सरकारी सुट्टी असते. परंतू काही इतिहासकार आणि शिवप्रेमी तिथीनुसारही मोठ्या जल्लोषात रयतेचा राजा असलेल्या शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.
(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2025 11:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

