Shiv Jayanti 2022 | File Image

जगभरातील शिवभक्तांसाठी 19 फेब्रुवारी ही तारीख खास असते. महाराष्ट्रात शिवनेरी किल्ल्यावर या दिवशी महाराष्ट्र सरकार तारखेनुसार शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी करते. दरम्यान शिवभक्तांमध्ये शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथी नुसार यामध्ये दोन गट विभागले गेले आहेत. पण सरकारने ऐतिहासिक दस्ताऐवज तपासून 19 फेब्रुवारी हीच शिवजयंती साजरी करण्यास सुरूवात केली आहे. या निमित्त शिवप्रेमी गल्लोगल्ली विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. यंदा कोरोनाचं संकटही निवळलं असल्याने निर्बंध शिथिल करत शिवजयंती साजरी करण्याला परवानगी देण्यात आली आहे. मग तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना आज शिवजयंतीच्या शुभेच्छा, मराठी संदेश, शुभेच्छापत्र, मेसेजेस, HD Images, Banner, WhatsApp Status द्वारा द्यायचे असल्यास खालील फोटोज तुम्ही नक्की शेअर करू शकता. नक्की वाचा: शिवजयंती हा उत्सव 19 फेब्रुवारीला साजरा करण्याची सुरूवात कशी आणि कधी झाली?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर शहाजी राजे आणि जिजाऊ यांच्या पोटी झाला. छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. असा त्यावर मजकूर आहे. नक्की वाचा: Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठी WhatsApp Status, Facebook Messages द्वारे द्या खास शुभेच्छा! 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी संदेश

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shiv Jayanti 2022 | File Image
Shiv Jayanti 2022 | File Image
Shiv Jayanti 2022 | File Image
Shiv Jayanti 2022 | File Image
Shiv Jayanti 2022 | File Image

महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये वेशभूषा स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, पोवाडे गायनाचे सोहळे तसेच शाहीरांचे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जातात. यामधून शिवरायांचा प्रताप, कथांमधून संस्काररूपी पुढल्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम केले जाते.