Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 Messages: प्रियजनांना सुंदर शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा पाठवून करा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी, पाहा फोटो
Shiv Jayanti HD Images| Photo Credits: File Image

Shiv Jayanti Messages in Marathi 2022 : छत्रपती शिवाजी महाराज देशाच्या शूर पुत्रापैकी एक होते. १६७४ मध्ये त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया रोवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भारतात दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. महाराष्ट्र सरकारने हा दिवस राज्यात सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे. शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापन केला. महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी, आपण शुभेच्छा पाठवून शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. तुम्हालाही हा दिवस साजरा करायचा असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम HD संदेश आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेसाठी ओळखले जात होते. नौदलाची संकल्पना मांडणारे ते पहिले भारतीय शासक होते. 1674 मध्ये, औपचारिकपणे छत्रपती किंवा मराठा साम्राज्याचा सम्राट म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. त्यावेळी फारसी भाषेचा वापर जास्त होत असल्याने शिवाजी महाराजांनी दरबारात आणि प्रशासनात मराठी आणि संस्कृतच्या वापराला चालना देण्याचा निर्णय घेतला. शिवभक्तांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा फेसबुक, व्हॉट्सअॅप स्टेटस आणि मेसेज पाठवून साजरी करा. आम्ही काही शिवजयंती विशेष संदेश,शुभेच्छा तयार केले आहेत जे तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईकांना, प्रियजनांना, मित्रांना पाठवू शकता.