Chhatrapati Samabhaji Maharaj Rajyabhishek Din 2024 Wishes: छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक दिनी अभिवादन करणारी मराठमोळी ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्र!
संभाजी महाराज । File Photo

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा (Chhatrapati Samabhaji Maharaj Rajyabhishek Din) 16 जानेवारी 1681 साली संपन्न झाला असल्याने शिवभक्त या दिवशी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणार्‍या शंभूराजेंना आदरांजली अर्पण करत त्यांच्या शौर्यकथेचे गोडवे गातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजीराजेंनी साम्राज्याची धुरा सांभाळली. रयतेला आधार देत शिवाजीमहाराजांनंतरही राज्याचा कारभार असाच सुरू राहिली अशी ग्वाही दिली होती. जनतेला दिलेला शब्द छत्रपती संभाजी राजेंनीही पाळला. मग आज त्यांच्या राज्याभिषेक दिनी सोशल मीडियाच्या माध्यमातून WhatsApp Messages, Wishes, Greetings शेअर करून अभिवादन करायला विसरू नका.

संभाजी महाराजांचा जन्म 14 मे इ.स. 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनचं मिळाले होते. शिवरायांप्रमाणेच संभाजीराजेंना देखील जिजाऊ मातेच्या मायेची ऊब आणि संस्कारांची शिदोरी मिळाली होती. Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din 2024: छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाची तारीख, इतिहास आणि महत्त्व, जाणून घ्या .

संभाजी महाराजांना मानवंदना

संभाजी महाराज । File Photo

छत्रपती संभाजी महाराजांना

राज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा!

संभाजी महाराज । File Photo

कोंढाण्यासाठी तानाजी गेला

घोडखिंडीसाठी समोर बाजी आला

महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी

स्वराज्य रक्षक संभाजी झाला

छत्रपती संभाजी महाराजांना

राज्याभिषेक दिनी विनम्र अभिवादन!

संभाजी महाराज । File Photo

मराठा राजा महाराष्ट्राचा

म्हणती सारे माझा माझा

आजही गौरव गिते गाती

ओवाळूनी पंचारती

तो फक्त राजा संभाजी!

संभाजी महाराज । File Photoस्वराज्याच्या मातीसाठी

अमर झालेल्या संभाजी महाराजांना

राज्याभिषेक दिनी कोटी कोटी प्रणाम

संभाजी महाराज । File Photo

श्रृंगार होता संस्काराचा

अंगार होता स्वराज्याचा

शत्रुही नतमस्तक होई जिथे

असा पुत्र आपल्या शिवबाचा

छत्रपती संभाजी महाराजांना

राज्याभिषेक दिनी विनम्र अभिवादन

मुघलांच्या तावडीत सापडल्यानंतर संभाजी राजे यांनी भयावह यातना सहन केल्या मात्र आपले धैर्य सोडले नाहीत. स्वराज्यासाठी ते शत्रूपुढे झुकले नाहीत. त्यांच्या याच शौर्याने त्यांना आज अजरामर केले आहे.