अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) दिवशी गंगोत्री आणि यमुनात्रीचे दरवाजे उघडल्यानंतर 9 मे दिवशी केदारनाथ आणि आज 10 मे दिवशी बद्रीनाथचे (Badrinath) दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे आता चार धाम यात्रा 2019 (Char Dham Yatra) ला सुरूवात झाली आहे. आज पहाटे 4 वाजून 15 मिनिटांच्या मुहूर्तावर भगवान बद्रीनाथाच्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. Chardham Yatra 2019: उत्तराखंडमध्ये तब्बल 6 महिन्यानंतर भक्तांसाठी उघडण्यात आले केदारनाथ मंदिराचे दरवाजे
परंपरेनुसार, बद्रीनाथ धाम सहा महिने सामान्य भाविकांसाठी आणि सहा महिने देव पूजेसाठी उघडण्यात येतात. 20 नोव्हेंबर 2018 ला बंद झालेले दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. पौराणिक कथांनुसार बद्रीनाथवर सुरूवातीला भगवान शंकराचं वास्तव्य होते मात्र कालांतराने तेथे भगावान विष्णू वास्तव्यास आले.
ANI Tweet:
Uttarakhand: The portals of Badrinath shrine have been thrown open for pilgrims early morning today. pic.twitter.com/u12IX6uB89
— ANI (@ANI) May 10, 2019
शंकराला का सोडावं लागलं बद्रीनाथ धाम?
हिंदू पौराणिक कथांनुसार, बद्रीनाथ धामवर भगावान शंकर त्यांच्या परिवारासह वास्तव्याला होते. मात्र त्यावेळेस भागवान विष्णूदेखील नवी आणि एकांत मिळेल, त्यांचं ध्यान भंग होणार नाही अशी जागा शोधत होते. अशी जागा बद्रीनाथच असेल त्यांना वाटले. ही जागा मिळवण्यासाठी त्यांनी लहान मुलाचं रूप घेतलं. बद्रीनाथ जवळ जाऊन जोरजोरात रडायला सुरूवात केली. लहान मुल रडत आहे हे पाहून पार्वती बाहेर आल्या आणि त्याला शांत करायला सुरूवात केली.
पार्वती लहान मुलाच्या अवतारामधील विष्णूला घेऊन आत गेली. हा प्रकार महादेव शंकर यांच्या लक्षात आला. रडणार्या मुलाला पार्वतीने झोपवले. पार्वती देवी बाहेर गेल्यानंतर विष्णूंनी आतून दरवाजा बंद केला आणि महादेवांना बद्रीनाथ हीच जागा ध्यान करण्यासाठी उत्तम असल्याचं सांगितलं. तसेच महादेवांना परिवारासह केदारनाथवर जाण्यासाठी विनंती केली. बद्रीनाथावरूनच भविष्यात भगवान विष्णू भाविकांना दर्शन देतील असे ठरले. तेव्हापासूनच बद्रीनाथ विष्णूचं आणि केदारनाथ भगावान महादेवाचं श्रद्धास्थान बनलं.