
Happy World Water Day 2023 Quotes: दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन (World Water Day 2023) साजरा केला जातो. पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. 1.6 टक्के पाणी जमिनीखाली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळणारे 97 टक्के पाणी समुद्र आणि महासागरांमध्ये आहे, जे पिण्यासाठी उपयुक्त नाही. फक्त 3 टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. वाढत्या लोकसंख्येला पाण्याच्या उपलब्धतेसाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत. जागतिक जल दिनाचा उद्देश जगातील सर्व देशांतील सर्व लोकांपर्यंत स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पोहोचवणे तसेच पाण्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे हा आहे.
पाण्याचे महत्त्व, उपयोगिता, महत्त्व समजून घेण्यासाठी आणि वाढत्या जलसंकटाकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी जगभरातील सर्व देशांमध्ये जागतिक जल दिन साजरा केला जातो. दरवर्षी त्याची थीमही ठेवली जाते. (हेही वाचा - Gudi Padwa 2023: गुढीपाडव्यानिमित्त गुढी कशी उभारावी? गुढी उभारण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात? आणि त्याचं महत्त्व काय? जाणून घ्या)
दरवर्षी, पाणी दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जल परिषद आयोजित केली जाते. यावर्षी 22 ते 24 मार्च दरम्यान न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र 2023 ची जल परिषद होणार आहे. जागतिक जल दिनानिमित्त WhatsApp Status, Facebook Messages, SMS द्वारे शुभेच्छा देऊन तुम्ही हा दिवस आणखी खास बनवू शकता. खालील कोट्सच्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवारास जल दिनाच्या शुभेच्छा नक्की द्या.







यावर्षी जागतिक जल दिन 2023 ची थीम 'ऍक्सिलरेटिंग चेंज' अशी ठेवण्यात आली आहे. यावर्षी 2023 मध्ये 'बी द चेंज' मोहिमेअंतर्गत जलदिन साजरा केला जाणार आहे. जगभरात पाण्याचे महत्त्व सांगण्यासाठी आणि जलसंवर्धनाकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी जागतिक जल दिन साजरा केला जातो.