Republic Day 2025 Messages in Marathi: 1950 मध्ये संविधान लागू झाल्यापासून दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन (Republic Day 2025) साजरा केला जातो. हा दिवस देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शाळा-महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकवला जातो. एवढेच नाही तर नवी दिल्लीतील ड्युटी पथावर भारतीय सशस्त्र दलांच्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या परेडचे आणि झांकीचे आयोजन केले जाते. दिल्लीतील या कार्यक्रमात लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. 7 ऑक्टोबर 1947 रोजी 299 सदस्यीय संविधान सभेने भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यास सुरुवात केली. भारतीय संविधानाला अंतिम रूप देण्यासाठी एकूण तीन वर्षे लागली, ज्यामध्ये डॉ. बी.आर. आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
दरम्यान, 26 जानेवारी 1950 रोजी अधिकृतपणे संविधान लागू झाले. हा दिवस ब्रिटीश राजवटीपासून एका सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताकात भारताच्या संक्रमणाचे प्रतीक आहे. भारतीय नागरिक या दिवशी एकमेकांना सोशल मीडियाद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्र-परिवारास Republic Day Wishes, Images, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन हा राष्ट्रीय उत्सव साजरा करू शकता.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा -
तीन रंग प्रतिभेचे, नारंगी, पांढरा अन् हिरवा,
रंगले न जाणो किती रक्ताने,
तरी फडकतो नव्या उत्साहाने...
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
रंग, रूप, वेश, भाषा
जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी..
ज्यांनी भारत देश घडवला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
ना हिंदू, ना मुसलमान
फक्त माणूस बना माणूस.
मानवता हाच धर्म माना.
वंदे मातरम!
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
देश विविध रंगाचा, ढंगाचा..
विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
या वर्षी भारत 26 जानेवारी 2025 रोजी आपला 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त, नवी दिल्लीतील कार्तव्य पथ येथे एक परेड आयोजित केली जाते. तसेच, देशभरातील विविध राज्यांतील चित्ररथाची मिरवणूक काढली जाते.