
Nag Panchami 2024 Messages in Marathi: विशेषत: महाराष्ट्रात नागपंचमी (Nag Panchami 2024) चा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी घरातील महिला नागदेवतेची पूजा करतात आणि परंपरेनुसार सापाला दूध पाजतात. तसेच आपल्या भावांच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतात. इंग्रजी कॅलेंडरनुसार, यावर्षी नागपंचमीचा सण 09 ऑगस्ट 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. नागदेवतेची पूजा केल्याने शुभ फल प्राप्त होते.
श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. या महिन्यात साप जमिनीखालून बाहेर पडून जमिनीवर येतात. साप बाहेर पडून कोणाचेही नुकसान करू नये, म्हणून नागपंचमीला पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी सापाची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. याशिवाय, या दिवशी लोक एकमेकांना नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा देखील पाठवतात. नागपंचमी (Nag Panchami) सणानिमित्त तुम्ही देखील HD Images, Wallpapers फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतरही सोशल मीडियावरुन आपल्या मित्र-परिवारास नागपंचमीच्या शुभेच्छा पाठवू शकता.
पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी,
सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती,
अशा वातावरणाची परसात घेऊन
आला आला श्रावण महिना
या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला
नागपंचमीच्या शुभेच्छा…

निसर्गाच्या बांधीलकीतून
नागपंचमीचा सण निर्माण झाला,
शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा,
शिवाच्या गळ्यातील हार झाला
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नको केवळ आंधळी पूजा
नाग दूध पित नाही कधीच
देऊ नका त्याला नाहक सजा
नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा

नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय असावा
हिच परमेश्वरचरणी प्रार्थना…
या नागपंचमी साजरी करू या
ईश्वररूपी नागाचे रक्षण आणि निसर्गाचे जतन करूया नागपंचमीच्या शुभेच्छा

सण आला नागपंचमीचा,
मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा,
हिच आमची सदिच्छा
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. नागपंचमीचा दिवस भगवान शंकराची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सकाळी स्नान करून महादेवाला फुले, धतुरा, फळे आणि दूध अर्पण करावे. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.