Happy Dhulivandan Wishes in Marathi: होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग-गुलालासह धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी लोक रंगांची होळी खेळतात. या दिवशी सर्वजण सर्व तक्रारी विसरून एकमेकांच्या रंगात रंगून जातात. धुलिवंदन हा सण धुलंडी, धुरेडी किंवा धुरखेल या नावांनी देखील ओळखले जातो. पुराणातही धुलिवंदन सणाचा उल्लेख आढळतो. यानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथीला धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. यंदा धुलिवंदनाचा सण 7 मार्चला साजरा होणार आहे.
पौराणिक कथेनुसार, या दिवशी असुर हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता, पण हिरण्यकश्यपला हे अजिबात आवडले नाही. त्याने प्रल्हाद या मुलाला देवाच्या भक्तीपासून दूर ठेवण्याचे काम त्याची बहीण होलिकाकडे सोपवले. जिला वरदान होते की, अग्नी तिच्या शरीराला जाळू शकत नाही. भक्तराज प्रल्हादचा वध करण्याच्या उद्देशाने होलिकाने त्याला आपल्या मांडीत घेऊन अग्नीत प्रवेश केला, परंतु प्रल्हादांच्या भक्तीचा महिमा आणि भगवंताच्या कृपेमुळे होलिका स्वतः आगीत होरपळून निघाली. आगीत प्रल्हादच्या शरीराला कोणतीही हानी झाली नाही. जेव्हा भक्त प्रल्हादांचा उद्धार झाला तेव्हा संपूर्ण विश्व आनंदाने भरून गेले आणि सर्वत्र फुलांचा वर्षाव झाला. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. धुलिवंदनानिमित्त मराठमोळे Messages, Greetings, Images, शेअर करून रंगाचा सण साजरा करा. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !
होळीच्या पवित्र अन्निमध्ये, निराशा,
दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
आणि सर्वांच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य आणि शांति नांदो.
होळी व धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
थंड रंग स्पर्श,
मनी नव हर्ष…
अखंड रंग बंध
जगी सर्व धुंद..
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
धूलिवंदन निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
होळीच्या अणि धुलिवंदनच्या
हार्दिक शुभेच्छा…!!!
भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
धुलिवंदनाच्या शुभेच्छा !
महाराष्ट्रात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीचा सण साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते.हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावण्याची प्रथा आहे.