Happy Eid al-Adha Mubarak 2025 HD Images (Photo Credit - File Image)

Happy Eid al-Adha Mubarak 2025 HD Images: बकरी ईदलाचं (Bakrid 2025) ईद-उल-अजहा (Eid al-Adha 2025) म्हणूनही ओळखले जाते, हा मुस्लिम समुदायाचा एक प्रमुख सण आहे. हा सण केवळ त्यागाचे प्रतीक नसून अल्लाहप्रती समर्पण, त्याग आणि मानवतेची भावनेचे प्रतिबिंब आहे. हा इस्लामच्या सर्वात पवित्र आणि महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे.

इस्लामिक कॅलेंडरनुसार, जिल हिज्जा महिन्याच्या 10 तारखेला बकरी ईद साजरी केली जाते. यंदा 7 जूनला बकरी ईद साजरी केली जाणार आहे. सोशल मीडियावर खालील ईद उल-अधा मुबारकच्या शुभेच्छा, ईद उल-अधाच्या शुभेच्छा, बकरीद मुबारक शुभेच्छा, व्हॉट्सॲप स्टेटस द्वारे शेअर करून तुम्ही आपल्या मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा पाठवू शकता.

अल्लाह तुमच्या जीवनात आनंद घेऊन येवो,

बकरी ईदच्या शुभेच्छा!

ईद अल अधा मुबारक

Happy Eid al-Adha Mubarak 2025 HD Images 1 (Photo Credit - File Image)

ईद अल-अधा मुबारक!!!

Happy Eid al-Adha Mubarak 2025 HD Images 2 (Photo Credit - File Image)

बकरी ईद आणि ईद अल अधाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Eid al-Adha Mubarak 2025 HD Images 3 (Photo Credit - File Image)

ईद अल अधाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Eid al-Adha Mubarak 2025 HD Images 4 (Photo Credit - File Image)

ईद अल अधाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

Happy Eid al-Adha Mubarak 2025 HD Images 5 (Photo Credit - File Image)

या सणाची सुरुवात एका ऐतिहासिक आणि आध्यात्मिक घटनेशी संबंधित आहे. इस्लामिक श्रद्धेनुसार, अल्लाह हजरत इब्राहिम यांच्या श्रद्धेची परीक्षा घेऊ इच्छित होता. अल्लाहने त्यांना त्यांच्या सर्वात प्रिय वस्तूचे बलिदान देण्याचा आदेश दिला. हजरत इब्राहिम यांचे पुत्र हजरत इस्माइल हे सर्वात प्रिय होते. अल्लाहच्या आदेशाचे पालन करून त्यांनी आपल्या मुलाचे बलिदान देण्याचा निर्णय घेतला. परंतु जेव्हा त्यांनी आपल्या मुलाच्या गळ्यावर चाकू चालवला तेव्हा अल्लाहने एक चमत्कार केला. हजरत इस्माइलऐवजी एका प्राण्याची कुर्बानी देण्यात आली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी बकरी ईदला कुर्बानी दिली जाते.