Mahashivratri 2025 Messages in Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)

Mahashivratri 2025 Messages In Marathi: दरवर्षी महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2025) उत्सव महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहाच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो. हा दिवस शिव आणि पार्वतीच्या मिलनाचा दिवस असल्याचेही म्हटले जाते. असे मानले जाते की, या तिथीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व संकटे दूर होतात. महाशिवरात्रीचा उपवास अन्न न घेता पाळला जातो. या उपवासात दिवसभर अन्न खाल्ले जात नाही. म्हणून, या दिवशी उपवासाला केवळ फळे आणि दूध प्यायले जाते. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसा झोपणे निषिद्ध मानले जाते.

हिंदू धर्मग्रंथांनुसार, एका वर्षात 12 शिवरात्री असतात. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला शिवरात्री येते. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री येते. तथापी, महाशिवरात्री वर्षातून फक्त एकदाच येते. यंदा 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. तुम्ही या दिवशी Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देऊन हा शुभ दिवस साजरा करू शकता.

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahashivratri 2025 Messages in Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

हर हर महादेव !
जय जय शिवशंकर ।
महाशिवरात्रीच्या सर्वांना
शिवमय शुभेच्छा
जय भोलेनाथ ।

Mahashivratri 2025 Messages in Marathi 2(फोटो सौजन्य - File Image)

जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात
आणि
जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Mahashivratri 2025 Messages in Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

शिव सत्य आहे,
शिव अनंत आहे,
शिव अनादी आहे,
शिव भगवंत आहे,
शिव ओंकार आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव भक्ती आहे,
शिव शक्ती आहे
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Mahashivratri 2025 Messages in Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)

काल पण तूच
महाकाल पण तूच
लोक ही तूच
त्रिलोकही तूच
शिव पण तूच
आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahashivratri 2025 Messages in Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

या दिवशी शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने मोक्ष मिळतो. तसेच शिवलिंगावर मधाचा अभिषेक केल्याने धनसंपत्ती वाढते, असं मानलं जातं.