Matru Din 2024 Wishes (PC - File Image)

Matru Din 2024 Wishes: जगातील सर्व नातेसंबंधांमध्ये आईचे नाते हे सर्वात पवित्र आणि सर्वोच्च आहे. आई म्हणजे जी आपल्याला जन्म देते, आपले पालनपोषण करते आणि आपल्या सुख-दुःखात कोणत्याही अटीशिवाय साथ देते. तिच्या अफाट त्याग, अपार आपुलकी आणि निस्वार्थ प्रेमाच्या तुलनेत शब्दही फिके पडतात. मदर्स डे हा एक असा पवित्र प्रसंग आहे, ज्याच्या निमित्ताने आपण आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि तिचे ऋण फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो.

दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मातृदिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा 12 मे रोजी जगभरात मदर्स डे साजरा केला जाईल. हा दिवस खास बनवण्यासाठी मातृदिनानिमित्त शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. मातृदिनानिमित्त Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून आपल्या आईला खास शुभेच्छा देऊन तुम्ही 'मदर्स डे' साजरा करू शकता.

तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे

आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!!!

मदर्स डे च्या निमित्ताने फक्त माझे तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करत आहे….आई कायम हसत राहा

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Matru Din 2024 Wishes (PC - File Image)

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी

तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Matru Din 2024 Wishes (PC - File Image)

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते

डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते

डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Matru Din 2024 Wishes (PC - File Image)

जगात असे एकच न्यायालय आहे,

जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई…

मातृदिनाच्या शुभेच्छा!

Matru Din 2024 Wishes (PC - File Image)

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी

आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी

Happy Mothers Day!

Matru Din 2024 Wishes (PC - File Image)

दरवर्षी येणारा मदर्स डे आपल्याला आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो. आई हा शब्द ऐकला की बालपणीच्या त्या गोड आठवणी ताज्या होतात. आई ही आपल्या आयुष्यातील पहिली गुरू आहे, जी आपल्याला चालण्याचे, बोलण्याचे आणि योग्य-अयोग्य यातील फरक ओळखण्याचे ज्ञान देते. आईच्या हळुवार स्पर्शात आपली सर्व दु:खं मिटवण्याची जादू असते.