
Marathi Bhasha Din 2025 Wishes: दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो, जो मराठी भाषा दिन म्हणून प्रसिद्ध आहे. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (Vishnu Vaman Shirwadkar) ऊर्फ कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी लोक विष्णू वामन शिरवाडकर यांचे स्मरण करतात. मराठी भाषेला समृद्ध आणि संवर्धन करण्यात मोलाची भूमिका बजावणारे ते एक प्रसिद्ध मराठी कवी, लेखक आणि समाजसुधारक होते.
कुसुमाग्रज यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि भाषेचा गौरव करण्यासाठी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून निवडण्यात आला. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना मराठी भाषा गौरव दिनच्या शुभेच्छा देतात. याशिवाय, शाळा, कॉलेजमध्ये देखील मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी भाषा दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes, Greetings घेऊन आलो आहोत. तुम्ही ते सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), टेलिग्राम (Telegram) या माध्यमातून शेअर करू शकता.
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा -
माय मराठीचा दिमाख आगळा
वर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळा
विरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजली
वृतांच्या बागेतून शब्द फुले उमलली
ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा.
जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माय मराठीचा आम्हास असे अभिमान
सर्वांना दिले तिने शब्दांचे अमोघ दान
कधी न विसर पडो तिचीया वांङमयाचा
सदैव निनादत राहो गजर मराठीचा
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

खिडक्या हवेत बांधता येत नाहीत
त्यासाठी आधी घर बांधायला हवं.
मुलांना इंग्रजी जरूर शिकवा,
पण त्यांचा मराठीशी,
मायभाषेची असलेला संबंध तोडू नका.
तो तुटला तर मुलं देशात
राहूनही परदेशी होतील
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी
जिने आपल्याला घडवले
आता तिचे अस्तित्व टिकवणे
आपल्या हातात आहे
आग्रहाने मराठीचाचं वापर करा..!
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जन्मदात्री ने जग दाखवले
माय मराठी ने जग शिकवले
भिन्न धर्म व भिन्न जाती
महाराष्ट्राची अतुल्य संस्कृती
अभिमान हा जन मनी वसे
मराठी आपली मायबोली असे
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

26 जानेवारी, 1965 पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून देवनागरी लिपितील मराठी भाषेचा अंगीकार करण्यात आला आहे. मराठी भाषेचा उदय प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला, असे मानले जाते.