Happy Women's Day 2024 Messages in Marathi: जागतिक महिला दिनानिमित्त Images, WhatsApp Status, Wishes द्वारे खास मराठी शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस!
Happy Women's Day 2024 Messages (PC - File Image)

Happy Women's Day 2024 Messages in Marathi: भारतीय संस्कृतीत महिलांच्या सन्मानाला नेहमीच महत्त्व दिले गेले आहे. भारतात महिलांची देवीप्रमाणे पूजा केली जाते. स्त्री ही कोणत्याही समृद्ध घरासाठी लक्ष्मीसारखी असते. आज महिला केवळ घराचीच नव्हे तर देशाची शान बनत आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रात महिलांचे कर्तृत्व वाढत आहे. महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि महिलांचे महत्त्व साजरे करण्यासाठी जगभरात 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day 2024) साजरा करण्यात येतो.

या लेखात, आम्ही तुमच्यासाठी महिला दिनानिमित्त (Women's Day 2024) काही निवडक मराठी संदेश आणले आहेत, जे तुम्ही तुमच्या आयुष्यातील आई, बहिण, पत्नी, प्रेयसी, मैत्रीण, आदी भूमिका निभावणाऱ्या स्त्रीयांना पाठवू शकता. (वाचा -International Women’s Day 2024: 5 बॉलीवूड चित्रपट ज्यात स्त्रिया मुख्य भूमिकेत, जाणून घ्या अधिक माहिती)

स्त्री असते एक आई,

स्त्री असते एक ताई,

स्त्री असते एक पत्नी,

स्त्री असते एक मैत्रिण,

प्रत्येक भूमिकेतील 'ती'चा करा सन्मान.

महिला दिनाच्या शुभेच्छा!

Happy Women's Day 2024 Messages (PC - File Image)

नारी हीच शक्ती आहे नराची,

नारी हीच शोभा आहे घराची,

तिला द्या आदर, प्रेम, माया,

घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा.

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Women's Day 2024 Messages (PC - File Image)

ती आई आहे, ती ताई आहे,

ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे,

ती पत्नी आहे, ती सून आहे,

ती सासू आहे, ती आजी आहे.

पण याआधी ती एक स्त्री आहे.

जिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

Happy Women's Day 2024 Messages (PC - File Image)

स्मरण त्यागाचे,

स्मरण शौर्याचे,

स्मरण कर्तृत्त्वाचे,

स्मरण स्त्री पर्वाचे.

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Women's Day 2024 Messages (PC - File Image)

तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,

तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

Happy Women's Day 2024 Messages (PC - File Image)

दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन जगभरातील विविध प्रदेशांमध्ये महिलांबद्दलचा आदर, कौतुक आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक यशाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.