
Happy Father’s Day 2024 Wishes in Marathi: वडील आणि मुलांचे नाते वेगळे आणि अतिशय खास असते. वडील बाहेरून कडक दिसत असले तरी मुलांच्या बाबतीत मनाने अतिशय मऊ असतात. फादर्स डे (Father’s Day 2024) हा वडील, आजोबा आणि वडिलांच्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा एक विशेष प्रसंग आहे. यावर्षी, 16 जून 2024 (रविवार) रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. पितृदिन म्हणजेच फादर्स डे हा वडिलांच्या त्यागाच्या भावनेला समर्पित आहे.
तुम्हालाही तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणायचे असेल, तर तुम्ही त्यांना फादर्स डेच्या निमित्ताने येथे दिलेल्या काही शुभेच्छा पाठवू शकता. हे मेसेज वाचून तुमच्या बाबांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. पितृदिनानिमित्त Images, Messages, WhatsApp Status द्वारे तुम्ही आपल्या वडिलांना खास शुभेच्छा पाठवू शकता.
बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंत:करण
जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!

कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरुपी बाबा
जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!

कधी खिसा रिकामा असला तरी
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही
वडिलांसारखा मनाने श्रीमंत
मी दुसरं कोणाला पाहिलं नाही
हॅपी फादर्स डे!

मला सावलीत बसवून
स्वतः जळत राहिले
असे एक देवदूत
मी वडिलांच्या रुपात पाहिले
वडिलांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

या जगात फक्त वडीलच असे व्यक्ती आहेत,
ज्यांना वाटते की,
त्यांची मुले त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावेत...
हॅपी फादर्स डे!

हा दिवस दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. वडील, कुटुंबातील शक्तीचा आधारस्तंभ, प्रत्येक मुलाचा खरा 'सुपरहिरो' असतात. जागतिक स्तरावरदेखील जूनच्या तिसऱ्या रविवारी पितृदिन साजरा केला जातो.