सध्या जगभरात हिंदू धर्मियांचा वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी (Diwali 2021) साजरा होता आहे. आनंदाचा, उत्साहाचा, दिव्यांचा, फराळाचा, रांगोळीचा हा उत्सव तब्बल 5 दिवस चाललो. वसुबारसपासून याची सुरुवात होते तर भाऊबीज (Bhaubeej 2021) हा या उत्सवातील शेवटचा दिवस. बहिण भावाच्या नात्यातील प्रेम, माया, ममता साजरा होणारी भाऊबीज यंदा 6 नोव्हेंबरला साजरी होईल. कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला 'यम द्वितीया' असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते, त्याला ओवाळते.
या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. भावाला अकाली मृत्यू येऊ नये म्हणून बहिण या दिवशी आपल्या भावाला ओवाळून त्याला टिळा लावते. तर यंदाच्या भाऊबीजेला खास मराठी Messages, Wishes, WhatsApp Status, HD Images च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण.
दरम्यान, पुराणकथेनुसार यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. (हेही वाचा: Bhaubeej 2021 Tika Muhurat: भाऊबीज दिवशी भावाच्या औक्षणासाठी पहा काय आहे शुभ मुहूर्ता ची वेळ)
भाऊबीजेच्या बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. भावाला गोड जेवण घालून त्याच्या कपाळावर टिळा लावावा व त्याचे औक्षण करावे त्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी. या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण केले पाहिजे.