Bhaubeej 2021 Thali Samagri: दिवा ते अक्षता, भाऊबीजेला भावाचं औक्षण करताना आज ताटात अवश्य ठेवा या 7 वस्तू
Bhaubeej | (File)

दिवाळी (Diwali)  सणाची सांगता आज भाऊबीजेच्या (Bhaubeej) सणाने होणार आहे. भाऊबीज अर्थात कार्तिक महिन्यातील द्वितीया. हा दिवस यम द्वितिया म्हणून देखील ओळखला जातो. या दिवसाच्या निमित्ताने बहिण भावाचं औक्षण करते. त्यानंतर ओवाळणी म्हणून भाऊ बहिणीला काही भेटवस्तू देतो. बहिण-भावातील नात्यातील गोडवा वाढवणारा हा दिवस पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यासाठी खास तयारी करत असाल तर बहिणींनो जाणून घ्या नेमकं आज भावाचं औक्षण करताना तुमच्या ओवाळणीच्या ताटात नेमकं काय काय असायला हवं? नक्की वाचा:  Bhaubeej 2021 HD Images: भाऊबीज निमित्त Wallpapers, Wishes शेअर करुन आपल्या बहिण-भावाच्या नात्यातील वाढवा गोडवा! 

हिंदू पुराण कथांनुसार, भाऊबीजेच्या दिवशी यम आपली बहिण यमुना हिच्या घरी जेवावयास जातो. त्यामुळे नरकातील जीवांना त्या दिवसापूरते मोकळे केले जाते. म्हणून या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो आणि बहिण भावाला आदराने, प्रेमाने ओवाळते. आपल्या भावाला दीर्घायुष्य, सौख्य, आनंद लाभावा म्हणून बहिण प्रार्थना करते. नक्की वाचा: Bhaubeej 2021 Tika Muhurat: भाऊबीज दिवशी भावाच्या औक्षणासाठी पहा काय आहे शुभ मुहूर्ता ची वेळ .

ओवाळणीच्या ताटात काय काय असावं?

  • कुंकू - भावाच्या कपाळावर कुंकू लावून ओवाळणीला सुरूवात केली जाते. यामुळे रक्षण होतं असा समज आहे.
  • अक्षता- अक्षता म्हणजे तांदूळ. कोणत्याही शुभ कार्यात त्याचा अवश्य समावेश केला जातो.
  • कापूस आणि सोन्याची अंगठी - ओवाळणीच्या वेळेस भावाच्या डोक्यावर कापूस आणि अंगठी ठेवली जाते.
  • नारळ - नारळ अर्थात श्रीफळाला देखील ओवाळणीच्या ताटात महत्त्व आहे.
  • दिवा- तूपाचा किंवा तेलाचा दिवा/ निरंजन याने भावाचं औक्षण करण्याची प्रथा आहे.
  • गोडाचा पदार्थ - ओवाळणीची सांगता भावाला गोडाचा पदार्थ भरवून केली जाते. (नक्की वाचा: Bhaubeej 2021: भाऊबीजेनिमित्त ओवाळणी आणि मेजवानी च्या ताटात ठेवण्यासाठी झटपट बनतील असे 6 गोडाचे पदार्थ).

भाऊबीजेला ओवाळताना प्रथम भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावा. त्यावर अक्षता लावा. कापूस आणि अंगठी भावाच्या डोक्यावर ठेवा. दिव्याचं ताट भावाच्या चेहऱ्यासमोर तीन वेळेस फिरवा. त्यानंतर गोडाचा पदार्थ भारावून भावाचा आशीर्वाद घ्या. ओवाळणी झाल्यानंतर बहीण - भाऊ एकमेकांना प्रेमाची वस्तू भेट म्हणून देतात.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.