
Bhaubeej 2021 Images: दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. बहिण-भावाचे मायेचे नाते जपणारा हा दिवस. भाऊबीजेसाठी भाऊ बहिणीकडे जातो. बहिण भावाला ओवळते आणि ओवाळणी म्हणून भाऊ बहिणीला छानसे गिफ्ट देतो. बहिणही भावाला गिफ्ट देते. अशी ही बहिण-भावाचे नाते वृद्धिंगत करणारी परंपरा सणाच्या निमित्ताने जपली जाते. यंदा शनिवार, 6 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेचा सण आहे. या निमित्ताने आपल्या बहिण-भावाला शुभेच्छा देण्यासाठी खास HD Images, Wallpapers, Wishes घेऊन आलो आहोत. सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter, इंस्टाग्राम (Instagram) द्वारे शेअर करुन बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा वाढवा.
आपल्याकडील सर्व सण महत्त्वपूर्ण आणि अर्थपूर्ण असतात. काही कथांच्या आधारे त्यांचे महत्त्व पटवून दिले जाते. सध्याच्या काळात या कथा लॉजिकली पटत नसल्या तरी त्यामागे मोठा अर्थ दडला आहे. त्यामुळे समजून उमजून सण साजरे कल्यास त्याचा पुरेपूर आनंद घेता येतो. (Happy Diwali 2021 Messages: दिवाळी मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Status, Facebook Messages द्वारे शेअर करुन साजरा करा दीपोत्सव!)
भाऊबीज शुभेच्छा!





दिवाळीचा सण मोठा असून तो संपूर्ण भारतवर्षात साजरा केला जातो. सर्वत्र उत्साही आणि आनंदी वातावरण असते. सणानिमित्त नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांच्या भेटीगाठी होतात. मात्र यंदा कोविड-19 संकटात विशेष काळजी घेऊन सण साजरे करणे योग्य ठरेल. तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!