
हिंदू धर्मीय दिवाळीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात. यंदा देशात कोरोना संकट आटोक्यात असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा थोडा जास्त उत्साह नागरिकांच्या मनात आहे. सध्या दिवाळीच्या दिवसांत रस्त्यावर खरेदी साठी ग्राहकांची पुन्हा तोबा गर्दी पहायला मिळत आहे. मग यंदा तुम्ही देखील व्हर्च्युअल दिवाळीपेक्षा प्रत्यक्ष भेटून तुमच्या बहिण - भावासोबत भाऊबीज(Bhaubeej) सण साजरा करणार असाल तर नक्कीच त्यांना गिफ्ट्स (Gifts) द्यायला पाहिजे. यंदा 6 नोव्हेंबरला साजरा होणारा भाऊबीजेचा सण उद्यावर येऊन ठेपला असला तरीही गिफ्ट्स ची खरेदी झाली नसेल तर पहा आता आयत्या वेळेस तुमच्या बहिण भावाला या सणानिमित्त काय गिफ्ट देऊ शकता.
भाऊबीज हा दिवस यम द्वितीया म्हणून ओळखला जातो. कार्तिक महिन्याच्या द्वितीयेला हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. नक्की वाचा: Bhaubeej 2021 Tika Muhurat: भाऊबीज दिवशी भावाच्या औक्षणासाठी पहा काय आहे शुभ मुहूर्ता ची वेळ.
भाऊबीजेची गिफ्ट्स आयडीयाज
- स्मार्ट वॉच
सध्या आरोग्य हा केंद्र बिंदू बनला असल्याने सारेच त्याच्याबद्दल दक्ष राहत आहे. शरीरातील लहान मोठ्या बदलांमुळेही संभवणारे मोठे धोके आता स्मार्टवॉचच्या माध्यमातून वेळीच हेरता येणार आहे. त्यामुळे तरूणाईला हे गिफ्ट नक्कीच आवडू शकतं.
- गिफ्ट व्हाऊचर्स
तुम्हांला अगदीच काय घेऊ हे कळत नसेल तर तुमच्या बहिण,भावा कडे त्यांच्या मनाच्या पसंतीचं गिफ्ट घेण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणजे गिफ्ट व्हाऊचर आहे. कपड्यांपासून फीटनेस सेंटर पर्यंत अनेक गोष्टींसाठी आता गिफ्ट व्हाऊचर्स उपलब्ध आहेत. गिफ्ट व्हाऊचर देणं हे अनेकदा दोघांसाठीही सोयीचं ठरतं.
- मेंबरशीप्स
तुमच्या बहिणीला किंवा भावाला भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून एखाद्या क्लबचं किंवा फीटनेस सेंटर/ जीमची मेम्बरशीप देऊ शकता.
- गॅझेट्स
आता अनेकजण वर्क फ्रॉम होम करत असल्याने इअरफोन्स, हटके ब्लू टुथ स्पीकर, स्क्रीन मधून येणार्या ब्लू रेज पासून डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी काही खास चष्मे किंवा तुमच्या भावा,बहिणींचं वर्क फ्रॉम होम थोडं सुकर करण्यासाठी काही गॅझेट्स गिफ्ट मध्ये देऊ शकता.
दरम्यान भाऊबीजेच्या सणाने 5 दिव्यांचा हा चैतन्यमय दिवाळसण संपणार आहे. पण तुमच्या नात्यामध्ये प्रत्येक वर्षागणिक गोडवा, विश्वास वृद्धिंगत व्हावा म्हणून एकमेकांना वेळ द्यायला विसरू नका. कोरोना संकटाने आपल्याला आपल्या माणसांची किंमत शिकवली आहे त्यामुळे त्यांना जपा आणि सुरक्षित वातावरणामध्ये हा गोड सण साजारा करा.