
दिवाळी मधील शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज (Bahu Beej). कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) दिवशी, बहिण भावाचे नाते वृद्धिंगत करणारा हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपल्या बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो असे मानतात. यामुळेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. असेही सांगितले जात की या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्व निर्माण होते त्यामुळे या दिवशी बहिण्याच्या सानिध्यात राहिल्याने, तिच्या हाताचे पदार्थ खाल्ल्याने भावाला व्यावहारिक आणि मानसिक लाभ होतात. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस 'भाऊबीज' म्हणून साजरा केला जातो. तर असा हा खास भाऊबीजेच्या दिवस, व्हॉट्सअॅप, फेसबूकच्या माध्यमातून काही HD Images, Wallpapers शेअर करून साजरा करा.





(हेही वाचा: Bhaubij Special Marathi Songs: बहीण भावाच्या नात्याची महती सांगणारी मराठीतील सदाबहार गीते)
दरम्यान, या दिवशी बहीण भावाला औक्षण करते. भाऊ नसेल तर बहीण चंद्राला ओवाळते. आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत याच दिवशी यमाला दीपदान करावयाचे असते. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे.