Places to visit in Mumbai on Independence Day: स्वातंत्र्य दिन हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या परिश्रमाची आणि बलिदानाची आठवण करून देण्यासाठी साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिनाला भारताला विशेष महत्त्व दिले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळावे या करिता अनेकांनी देशासाठी प्राण दिले. स्वतंत्र भारतात असं अनेक ठिकाण आहे जे आपल्या वीर सैनिकांची आठवण करून देतात. त्यापैकी मुंबई हे शहर पहिल्या स्थानावर आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत पाहण्यसाठी किंवा फिरण्यासाठी काही ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळे आहे. या ठिकाणी तुम्ही देशभक्तीची भावना अनुभवू शकता. (हेही वाचा- Is It The 77th Or 78th Independence Day? भारतात 15 ऑगस्ट रोजी कितवा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार, जाणून घ्या)
1.गेटवे ऑफ इंडिया
मुंबईतील सुप्रिध्द असलेलं स्मारक म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर कार्यक्रम, ध्वजवंदन सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लाईट शोचे आयोजन केले जाते. त्यामुळे पर्यटकांनी या दिवशी गेटवे ऑफ इंडियाला नक्की भेट द्यावी.
2. छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय
हे संग्रहालय मुंबईल प्राचीन काळातील आहे. शहरातील फोर्ट भागात हे वस्तू संग्रहालय आहे. भारताच्या इतिहासाच्या विविध पैलूंवर आधारित प्रदर्शने येथे पाहायला मिळतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त खास प्रदर्शन आणि कार्यक्रमही आयोजित केले जातात.
3. हुतात्मा चौक (फ्लोरा फाऊंटन)
हुतात्मा चौक या स्वातंत्र्यदिनानिमित्त शहीद झालेल्या लोकांना येथे श्रध्दांजली वाहली जाते. प्रांतरचनेच्या आंदोलनात शहीद झालेल्या लोकांच्या सन्मानार्थ बांधले गेले आहे. हे मुंबईतील एकमेक प्रसिध्द स्मारक आहे.
4. मरिन ड्राईव्ह
मरिन ड्राईव्हवर फिरण्यासाठी हजारो लोक दररोज येत असताता. स्वातंत्र्य दिनाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी कुटुंबासह फिरायला जाऊ शकता. येथे निसर्गरम्य वातावरण आणि संध्याकाळी होणारी रोषणाई (लाइटींग शो) आकर्षक असते.
5. शिवाजी पार्क
मुंबईतील दादर परिसरात असलेले शिवाजी पार्क हे ऐतिहासिक स्थळ आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन आणि देशभक्तीपर कार्यक्रम केले जातात. येथील वातावरण अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी असते.