भारतीय संस्कृतीत सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी `रथसप्तमी’हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासना करायची असते. त्यामुळे रथसप्तमी ला साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे. म्हणूनच या दिवसाला सूर्याचे फार महत्व आहे. या दिवशी सूर्याची पूजा केल्यास आपल्या आरोग्यावर त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात. यासाठी सूर्यनवरात्रीची प्रथा आहे. सूर्याला आपण रवी, भास्कर, मार्तंड, दिवाकर, प्रभाकर, दिनकर अशी अनेक नावे आहेत. तसेच सूर्याला आपण ऊर्जेचे स्त्रोत देखील म्हणतो.
अशा या ऊर्जेच्या स्त्रोताची रथसप्तमी दिवशी पूजा केल्यास आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. पाहूयात कोणते आहेत हे फायदे:
1. सूर्याच्या पूजेने, आराधनेने, दर्शनाने, सौरस्नानाने अनेक व्याधी, रोग नाहिसे होतात.
2. डोळ्यांचे, त्वचेचे, हाडांचे आरोग्य सुधारते.
3. त्वचेचे तेज वाढते.
हेदेखील वाचा- Ratha Saptami 2020: यंदा 1 फेब्रुवारीला साजरी होणार 'रथ सप्तमी'; जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व
4. सूर्यामुळे वातावरणातील सूक्ष्म जीवाणूंचा नाश होतो. ज्यामुळे घाणीचा, दुर्गंधीचा नाश होतो आणि चांगले आरोग्य लाभते.
5. विश्वाला प्रकाश देणाऱ्या या सूर्यदेवतेत गर्वाचा अभाव आहे, त्याच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकास होतो. मन, बुध्दी, शरीर विकसित होते
अशा या कर्मयोगी, निरपेक्षपणे आपले कर्तव्य बजावणा-या सूर्याला वंदन करण्याचा, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महत्त्वाचा दिवस. अनेक रोगांचा नाश करुन आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करणा-या या सूर्याला लेटेस्टली मराठी कडून कोटी कोटी प्रणाम.