
Basweshwar Jayanti 2023 : विश्वगुरु, लिंगायत धर्माचे धर्मगुरु महात्मा बसवण्णा यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला होता. वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वतामधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी सोपी वाटणारी पण माणसाला घडवणारी बहुमोलाची शिकवण बसवेश्वरांनी दिली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात बसवेश्वर जयंती हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात. अनेकांची अशी धारणा आहे की या दिवशी त्रेतायुगाची सुरूवात झाली. तर उत्तर भारतामध्ये या दिवसापासून सत्ययुगाचा प्रारंभ झाला असे मानतात. यंदा बसवेश्वर जयंती 22 एप्रिल रोजी आहे. बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने WhatsApp Status, Messages, HD Images च्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवून हा दिवस उत्साहात साजरा करा.
पाहा खास शुभेच्छा संदेश,






हिंदू धर्मीयांसाठी खास असलेला आणि साडेतीन मुहुर्तांपैकी एक अशा अक्षय्य तृतीयेचा सण आणि बसवेश्वर जयंती यंदा 22 एप्रिलला आहे. दिलेले खास संदेश पाठवून तुम्ही आजचा खास दिवस साजरा करू शकता.