Balasaheb Thackeray Birth Anniversary HD Images in Marathi: आज 23 जानेवारी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती (Balasaheb Thackeray Birth Anniversary). महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात अढळ स्थान मिळवणाऱ्या या नेत्याचा जन्म 1926 साली पुण्यात झाला. उत्तम व्यंगचित्रकार, तेजस्वी वक्ते आणि शिवसेना पक्षाचे संस्थापक अशी त्यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची व्यंगचित्रे समाजातील विविध प्रश्नांवर नेमकेपणाने बोट ठेवत असत. त्यांनी 1960 मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले, जे मराठी जनतेच्या भावना आणि प्रश्न मांडणारे ठरले. याच काळात त्यांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली.
पुढे 1966 साली त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. हा पक्ष मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारा म्हणून प्रसिद्ध झाला. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मराठी अस्मिता, हिंदुत्व, आणि सामाजिक न्यायासाठी लढा दिला. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणशैलीने लाखोंच्या मनावर राज्य केले. बाळासाहेबांनी कधीही निवडणूक लढवली नाही, मात्र त्यांच्या नेतृत्वाने राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार स्थापन केले. (हेही वाचा: Balasaheb Thackeray Birth Anniversary Quotes: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खास Images, WhatsApp Status, Messages द्वारे त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करून त्यांना अभिवादन करा)
राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासावर आपली अमीट छाप सोडणाऱ्या या नेत्याच्या जयंतीनिमित्त खास Messages, Wishes, Whatsapp Status, Images द्वारे त्यांच्या स्मृतीस अभिवादन करा.
दरम्यान, झुणका भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बाँबेचे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेब ठाकरेंची होती. बाळासाहेब ठाकरे हे फक्त एक नेता नव्हते, तर त्यांनी पुढील पिढीला प्रेरणा दिली, एक विचारधारा दिली. त्यांच्या कार्याचे स्मरण करणे म्हणजे एका संपूर्ण युगाचा आदर करणे होय.