Balasaheb Thackeray Birth Anniversary Quotes

Balasaheb Thackeray Birth Anniversary Quotes in Marathi: महाराष्ट्रातील शिवसेना (Shivsena) पक्षाचे संस्थापक, राजकारणी, उत्तम वक्ते, व्यंगचित्रकार अशी अनेक बिरुदे मिरवणारे महाराष्ट्राचे लाडके नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी जयंती (Balasaheb Thackeray Birth Anniversary 2025). त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंमुळे ते आजही महाराष्ट्राच्या हृदयात अढळ स्थान मिळवून आहेत. बाळ केशव ठाकरे यांचा जन्म पुण्यात 23 जानेवारी 1926 रोजी झाला. नऊ भावंडांमध्ये ते सर्वांत मोठे होते. मीनाताई ठाकरे यांच्याशी विवाहानंतर त्यांना बिंदुमाधव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही तीन मुले झाली. एक व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब लवकरच सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका मांडण्यास ओळखले जाऊ लागले.

पुढे 1960 मध्ये त्यांनी मार्मिक नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले, ज्यातून मराठी माणसाच्या हक्कांबाबत त्यांनी आवाज उठवला. याच संघर्षातून 1966 मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना झाली. शिवसेना पक्षाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश मराठी माणसाच्या हक्कांसाठी संघर्ष करणे हा होता. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पक्षाने राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव निर्माण केला. गळ्यात रुद्राक्षाची माळ, कणखर आवाज, आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व वाघासारखे भासे. आपल्या भाषणांमधून त्यांनी लोकांची मने जिंकली. त्यांचे भाषण कधीही फक्त राजकीय नव्हते, ते नेहमीच प्रेरणादायी असे.

महाराष्ट्रातील अशा या लोकप्रिय नेत्याच्या जन्मदिनी Images, WhatsApp Status, Messages द्वारे त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करून त्यांना अभिवादन करा.

Balasaheb Thackeray Birth Anniversary Quotes
Balasaheb Thackeray Birth Anniversary Quotes
Balasaheb Thackeray Birth Anniversary Quotes
Balasaheb Thackeray Birth Anniversary Quotes
Balasaheb Thackeray Birth Anniversary Quotes
Balasaheb Thackeray Birth Anniversary Quotes

दरम्यान, 23 जानेवारी 1989 रोजी, मध्यरात्री सामना या वृत्तपत्राचे दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात बाळासाहेबांच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रारंभी फक्त व्यंगचित्र प्रकाशित करणारे सामना कालांतराने शिवसेनेचे निर्भीड मुखपत्र बनले. त्यांच्या शब्दांनी महाराष्ट्राच्या राजकीय वृत्तपत्र सृष्टीत खळबळ उडवली. आजही सामना हे शिवसेनेचे महत्त्वाचे माध्यम मानले जाते. (हेही वाचा: RSS Reshimbagh Memorial Place: शिवसेना आणि आरएसएस विचारधारा एकच: एकनाथ शिंदे)

हिंदुत्वाच्या मुद्द्याला राजकीय वळण देत, बाळासाहेबांनी भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी केली आणि 1995 मध्ये महाराष्ट्रात पहिले काँग्रेसविरहित सरकार स्थापन केले. या यशस्वी सत्तांतराचे श्रेय बाळासाहेबांच्या प्रभावी नेतृत्वाला जाते. स्वतः निवडणूक न लढवता, किंगमेकरची भूमिका त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर देशभरातील जनतेसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.