शिवसेना पक्षप्रमुख, व्यंगचित्रकार, उत्कृष्ट वक्ते आणि समाजकारणी बाळ केशव ठाकरे (Bal Keshav Thackeray) यांच्या जयंतीचा आजचा दिवस आहे. महाराष्ट्रातील मराठी भूमिपुत्रांच्या न्याय आणि हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. आपल्या करियरची सुरूवात व्यंगचित्रकार आणि कालांतराने शिवसेना प्रमुख करून त्यांनी मराठी लोकांच्या हितासाठी कणखर भूमिका घेतली. आजही अनेक क्षेत्रातील मान्यवर त्यांचे चाहते आहेत. महाराष्ट्रातील अशा या नेत्याच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेले हे काही HD Images तुम्ही सोशल मीडीयात WhatsApp Status, Messages द्वारा शेअर करत तुम्हीही त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकता.
बाळासाहेब ठाकरे थेट निवडणूकीच्या रिंगणात नव्हते. कोणतेही संवैधानिक पद त्यांनी सांभाळलं नाही परंतू 'रिमोट कंट्रोल' म्हणून त्यांनी आपली भूमिका कायम ठाम ठेवली होती. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक शिवसैनिक विविध माध्यमातून आपलं प्रेम बाळासाहेब ठाकरेंसाठी व्यक्त करतात. मुंबई मध्ये जुन्या महापौर बंगल्याच्या जागी आता बाळ ठाकरेंच्या स्मृतिस्थळाची निर्मिती सुरू आहे. सध्या अनेक शिवसैनिक त्यांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये जमा होतात. Bal Thackeray Quotes: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त Images, Greetings, WhatsApp Status द्वारे शेअर करा त्यांचे प्रेरणादायी विचार!
पहा फोटोज
बाळासाहेबांच्या पश्चात आता शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहेत. राजकारणाच्या बदलत्या रंगानुसार, आता पक्षामध्ये, पक्षाच्या नेतृत्त्वामध्येही अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे आता शिवसेना पक्षा पुढे होणारा प्रवास कसा असेल हे पहावं लागणार आहे.