
Bal Thackeray Quotes: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात (Pune) झाला. बाळ ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई ठाकरे यांचे पुत्र होते. त्यांचे वडील केशव हे भारतात जन्मलेले ब्रिटीश लेखक विल्यम मेकपीस ठाकरे यांचे प्रशंसक होते. त्यांनी त्यांचे स्वतःचे आडनाव पनवेलकर वरून बदलून 'ठाकरे' केले. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. बाळ ठाकरे हे उजव्या विचारसरणीचे मराठी समर्थक नेते होते. ठाकरे यांनी व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात बॉम्बे येथील द फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी भाषेतील दैनिकातून केली.
बाळ ठाकरे यांनी फ्री प्रेस जर्नल, टाइम्स ऑफ इंडिया आणि मार्मिकसाठी व्यंगचित्रे काढली. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतात. आज त्यांच्या जयंतीनिमित्त Images, Greetings, WhatsApp Status द्वारे तुम्ही त्यांचे विचार सोशल मीडियावर शेअर करून त्यांना अभिवादन करू शकता. यासाठी तुम्हाला खाली ईमेज मोफत डाऊनलोड करता येतील.
पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना
पायाखाली तुडवायला
माझ्या आदेशाची वाट पाहू नका.
- बाळासाहेब ठाकरे

एकजुटीने राहा
जाती आणि वाद गाडून
मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा
तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.
- बाळ ठाकरे

वयाने म्हातारे झाले
तरी चालेल पण
विचाराने कधी म्हातारे नका होऊ.
- बाळ ठाकरे

जीवनात एकदा निर्णय घेतला कि
मागे फिरू नका,
कारण मागे फिरणारे
इतिहास रचू शकत नाहीत.
- बाळ ठाकरे

नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा
नोकऱ्या देणारे होऊ,
ही महत्वकांक्षा बाळगा.
- बाळ ठाकरे

तोंड वाजवून न्याय मिळत नसेल
तर तोंडात वाजवून न्याय मिळवा
पण न्याय मिळालाच पाहिजे.
- बाळ ठाकरे

हिटलरची स्तुती केल्यानंतर ठाकरे यांच्यावर टीका झाली होती. हिटलरने खूप क्रूर आणि कुरूप गोष्टी केल्या. पण तो एक कलाकार होता, मी त्याच्यावर प्रेम करतो. त्याच्याकडे संपूर्ण राष्ट्र, जमाव आपल्यासोबत घेऊन जाण्याची शक्ती होती, असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं होतं.