Bakari Eid 2023: यंदा बकरीद हा सण जून महिन्याच्या शेवटी आला आहे. इस्लाम धर्मात बकरीद सणाला फार महत्त्व दिले जाते. बकरीद ह्या सणाला त्यागाचे प्रतिक मानले जाते. अलिकडेच जिलहिज महिन्यात चंद्र दिसला. हा चंद्र दिसला की, पुढील बकरीची तारीख समोर येते. बकरीदला इस्लाम धर्मात , ईद-उल-अजहाला असेही म्हटले जाते. ह्या सणाला इब्राहिमने केलेल्या त्यागपित्यर्थ म्हणून साजरा केला जातो. ह्या दिनानिमित्त धार्मिक कुर्बानी दिली जाते.
यावर्षी ईद उल-अजहा म्हणजेच बकरीद हा सण 29 जून 2023 रोजी साजरा केला जात आहे. लखनौमधील मार्कजी चांद समितीचे अध्यक्ष मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली यांनी सोमवारी (19 जून, 2023) जिल्हिज महिन्याचा चंद्र दिसल्याची घोषणा केली.म्हणजेच रमजानचा चांद दिसल्यानंतर 70 दिवसानंतर हा सण साजरी केला जातो. याचदरम्यान सौदी अरेबियामध्ये 28 जून रोजी ईद उल-अजहा साजरी झाली आहे.
इस्लाम धर्मात या दिवशी त्यागाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. इस्लाम धर्मानुसार हजरत इब्राहीम याच दिवसी परमेश्वराच्या आदेशानुसार आपला मुलगा हजरत इस्माइलचे देवाला बलिदान देणार होता. अल्लाहने हजरत इब्राहिम यांची परिक्षा घेतली. अल्लाने इब्राहिमला त्याच्या सर्वात मौल्यवान वस्तूचे बलिदान देण्यास सांगितले. याचदरम्यान अल्लाला त्याच्या मुलाच्या कुर्बानी देणार होता इब्राहिमचा त्याग पाहून खुदाने त्याच्या मुलाला जीवनदान दिले. अल्लाहला ह्या प्रसंगाला खुश झाला. अल्लाहला त्याच्या मुलाऐवजी बकरीची कुर्बानी मिळाली. म्हणून बकरीदच्या दिवसी बकऱ्यांचा बळी दिला जात आहे आणि याच क्षणापासून ही परंपरा चालू झाली असल्याचे सांगितले जात आहे.
ह्या दिनाचे एकच उद्देश आहे की, प्रत्येक मनुष्यबळाने आपले जीवन ईश्वराला सर्मप्रीत करावे. ईश्वराने आपल्याला जीवन दिले आहे. त्यामुळे त्याची रक्षा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग इस्लाम धर्मिय लोकांकडून दिला जाईल.