Bail Pola 2023 Messages, Wishes, WhatsApp Status: भारत हा विविध संस्कृती आणि परंपरांचा देश आहे. या सांस्कृतिक परंपरेला सुंदर असे मूर्त रूप देणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रातील विवध पंपरा दाखवणाऱ्या अनेक सणांपैकी एक म्हणजे बैल पोळा. जो अनोख्या परंपरा आणि वैशिष्ट्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. बैलपोळा हा खरा शेतकऱ्याचा सण आहे. जो शेतकऱ्यांचे मित्र मानल्या जाणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने एकमेकांना मराठमोळ्या शुभेच्छा, बैलपोळ्याचे मेसेजेस, Greetings, GIFs, HD Images यांच्या माध्यमातून शेअर करून बळीराजाचा आनंद द्विगुणीत करतात. आपणही डिजिटल इंडियाचा आधार घेत एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी खालील मेसेज, इमेजेस आपण डाऊनलोड करु शकता.
बैलपोळा सणानिमित्त शुभेच्छा संदेश!
बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
जसे दिव्याविना वातीला
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय
तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा
दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
आज पुज रे बैलाले
फेडा उपकाराचं देणं
बैला खरा तुझा सण
शेतक-या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा
सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
बैल पोळा हा महाराष्ट्राच्या खोलवर रुजलेल्या कृषी संस्कृतीचा तो पुरावा आहे. हा सण शेतीतील गुरांचे महत्त्व मान्य करतो. विविध समुदायांना एकत्र आणते. हा सण, त्याच्या रंगीबेरंगी बेगड्या, पाककृतींसह, राज्याच्या समृद्ध वारशाचे एक चैतन्यशील प्रतिबिंब आणि समृद्धीच्या शोधात मानव आणि प्राणी यांच्यातील बंधनाची आठवण करून देणारा आहे. हा ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनाचा उत्सव आहे. राज्याच्या सांस्कृतिक विविधतेमध्ये स्वतःला विसर्जित करू इच्छित असलेल्या प्रत्येकासाठी हा आवश्यक आहे.