August 2022 Festivals: नागपंचमी, स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव यासह विशेष व्रत आणि विशेष दिवसांच्या तारखांची संपूर्ण यादी!

August 2022 Festivals: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध रंगांनी, सणांनी सजलेला देश आहे. भारतात ऑगस्ट महिन्यापासून सणांची नवी मालिकाच सुरू होते. यावर्षी ऑगस्ट महिन्याची सुरुवात नागपंचमी (2 ऑगस्ट) आणि फ्रेंडशिप डेने होत आहे. यानंतर, रक्षाबंधन (11 ऑगस्ट), कृष्ण जन्माष्टमी (19 ऑगस्ट), त्यानंतर गणेशोत्सवही आहे.  या महिन्यात 15 ऑगस्ट निमित्त संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सवही उत्साहात साजरा केला जाणार आहे. याशिवाय या महिन्यात पुत्रदा एकादशी, अजा एकादशी, नारळी पौर्णिमा, काजरी तीज, हरियाली तीज आदी सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणही साजरे केले जाणार आहेत. हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे. आणि त्यामुळे श्रावण सुरु झाल्यानंतर सणांची मालिकाच सुरु होते. [हे देखील वाचा :Shravan Month 2022 in Maharashtra: महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 29 जुलै पासून; श्रावणी सोमवार व्रत, मंगळागौर सह या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या जाणून घ्या तारखा]

ऑगस्ट महिन्यातील सण आणि उत्सव 

01 ते 7 ऑगस्ट - ऑगस्ट जागतिक स्तनपान आठवडा

01 ऑगस्ट ( सोमवार ) - बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी, श्रावणातला पहिला सोमवार 

02 ऑगस्ट (मंगळवार) - नाग पंचमी

05 ऑगस्ट (शुक्रवार) श्री दुर्गाष्टमी व्रत, श्रावणातला दुसरा शुक्रवार, आंतरराष्ट्रीय बिअर दिवस, जरा-जिवंतिका पूजन 

06 ऑगस्ट (शनिवार) हिरोशिमा दिन, श्रावणातला पहिला शनिवार 

07 ऑगस्ट- फ्रेंडशिप डे, राष्ट्रीय हातमाग दिवस

08 ऑगस्ट - (सोमवार) श्रावण पुत्रदा एकादशी, श्रावणातला दुसरा सोमवार 

09 ऑगस्ट - (मंगळवार) प्रदोष व्रत, जागतिक आदिवासी दिन, मोहरम, मंगलागौरी पूजन 

10 ऑगस्ट - (बुधवार) माजी राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांची जयंती

11 ऑगस्ट - (गुरुवार) रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा 

12 ऑगस्ट - (शुक्रवार) श्रावण महिन्यातील पौर्णिमा व्रत, आंतरराष्ट्रीय युवा दिन, जागतिक हत्ती दिन,श्रावणातला तिसरा शुक्रवार,जरा-जिवंतिका पूजन 

13 ऑगस्ट - (शनिवार) जागतिक अवयवदान दिन, आंतरराष्ट्रीय डाव्या हातांचा दिवस,श्रावणातला दुसरा शनिवार 

14 ऑगस्ट - (रविवार) काजरी तीज व्रत

१५ ऑगस्ट -(सोमवार) भारतीय स्वातंत्र्य दिन, संकष्टी चतुर्थी, राष्ट्रीय शोक दिन (बांग्लादेश), श्रावणातला तिसरा सोमवार, पतेती 

16 ऑगस्ट - (मंगळवार)  मंगलागौरी पूजन 

17 ऑगस्ट- (बुधवार) हलष्टी व्रत, वृद्धा गौरी व्रत

18 ऑगस्ट -(गुरुवार) कृष्ण जन्माष्टमी

19 ऑगस्ट -(शुक्रवार) दहीहंडी,जरा-जिवंतिका पूजन, श्रावणातला चौथा शुक्रवार

20 ऑगस्ट- (शनिवार) भारतीय अक्षय ऊर्जा दिवस

22 ऑगस्ट- (सोमवार) नारळी पौर्णिमा,श्रावणातला चौथा सोमवार

23 ऑगस्ट- (मंगळवार) भागवत एकादशी, मंगलागौरी पूजन

24 ऑगस्ट -(बुधवार) प्रदोष व्रत

25 ऑगस्ट- (गुरुवार) - मासिक शिवरात्री

26 ऑगस्ट- (शुक्रवार) पिठोरी अमावस्या, बैलपोळा, आंतरराष्ट्रीय श्वान दिन,जरा-जिवंतिका पूजन , श्रावणातला पाचवा शुक्रवार 

27 ऑगस्ट -(शनिवार) भाद्रपद अमावस्या, श्रावण महिना समाप्ती 

29 ऑगस्ट -(सोमवार) राष्ट्रीय क्रीडा दिन

30 ऑगस्ट- (मंगळवार) हरतालिका तृतीया, राष्ट्रीय लघु उद्योग दिन

३१ ऑगस्ट -(बुधवार) श्री गणेश उत्सव चतुर्थी, गणेशोत्सव प्रारंभ 

कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे, अशात त्रिसूत्रीचे पालन करून सगळे सण साजरा करा .